ठाणे शहर दूध व्यावसायिकांचा महायुतीला पाठिंबा

0

मुंबई : ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेने महायुतीला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यातील गरिब, कष्टकरी, शेतकरी, महिला यांच्या हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे संघटनेचे सहसचिव पांडुरंग चोडणेकर यांनी सांगितले. मुंबई ते पनवेलपर्यंत २५ हजार दूध विक्रेते आणि त्यांचे कुटुंबिय महायुतीला मतदान करतील, असे चोडणेकर यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय महायुतीला दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्था आणि बजरंग सेना या दोन संघटनांनी आज पाठिंबा जाहीर केला. महायुती सरकारने विविध समाजासाठी महामंडळे सुरु केली. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण लागू केले. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राबवून महिलांना सक्षम केले, त्यामुळे महायुतीला विजयी करण्यासाठी पाठिंबा देत असल्याचे बजरंग सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष अविनाश डुलगज यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech