ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये ठाणे शहरात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कॅडबरी रोड परीसरात मतदारांचे प्रमाण अधिक आहे, म्हणून या परिसरात ट्रॅफिक सिग्नलवर वाहनांची संख्या अधिक असते. याचेच औचित्य साधून 148 ठाणे विधानसभा मतदारसंघ स्वीप पथक यांच्या मध्यामतून महिला रिक्षाचालक हातात मतदान जनजागृती संदेश असलेले पोस्टर घेऊन रस्त्याच्या दुर्तफा उभ्या होत्या. या ठिकाणी रिक्षा ऑडियोद्वारे मतदान जनजागृती करण्यात येत होती. दोन्ही बाजूनी येणारी वाहने महिला रिक्षाचालकांच्या हातातले पोस्टर लक्ष वेधून घेत होते व वाहनांमधील नागरिक, येणारे जाणारे पादचारी नागरिक त्यांना चांगला प्रतिसाद देत होते.
“मी मतदान करणारंच… आपणही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा” या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान 20 नोव्हेंबर असे दर्शविणारे माहितीपत्रकाचे वाटपही सर्व नागरिकांना करण्यात आले आणि लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वांनी न चुकता 20 नोव्हेंबर रोजी अवश्य मतदान करावे, असे आवाहान सर्व नागरिकांना करण्यात आले.