पुणे : आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा शोधण्यासाठी राज्याची यंत्रणा उभी राहिली. मात्र, देशमुख कुटुंबातील सदस्याची हत्या झाली, त्यातील पाचवा आरोपी ६० दिवस उलटूनही सापडत नाही. हे किती दुर्दैव आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूरच्या दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारवर टीका केली. सुळे म्हणाल्या, ‘‘परभणी आणि बीड या दोन्ही घटनांत न्याय मिळाला पाहिजे. बीडमधील देशमुख कुटुंब प्रचंड अस्वस्थ आहे. त्या कुटुंबाला आधार द्यायला कोणीच नाही. मी मंगळवारी त्यांना भेटायला जाणार आहे. देशमुख यांची मुलगी बारावी परीक्षेच्या काळात वणवण फिरत वडिलांसाठी न्याय मागत आहे. तिचे अश्रू या सरकारला दिसत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.