मुंबई – मध्य रेल्वे, मुंबई विभाग, रामावतार मीना, हेड तिकीट कलेक्टर, यांनी अतुलनीय शौर्य दाखवून एका महिला प्रवाशाला जीवित हानी होण्यापासून वाचवले. दि. ०६.०९.२०२४ रोजी ट्रेन क्रमांक 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस पुणे स्टेशन, प्लॅटफॉर्म क्रमांक ३ येथे आली तेव्हा एक महिला प्रवासी अनवधानाने घसरली आणि चालत्या ट्रेनखाली जाण्याचा धोका होता. जेव्हा रामावतार मीना, हेड तिकीट कलेक्टर, मुंबई विभाग, यांनी तिला पडताना पाहिले तेव्हा त्यांनी उल्लेखनीय शौर्याने आणि त्यांनी प्रसंगावधान दाखवून, आपली बॅग फेकून दिली आणि महिला प्रवाशाला सुरक्षित खेचण्यात यश मिळविले, ज्यामुळे तिला वाचवण्यात यश आले. या प्रयत्नात त्यांना बी.आर. मीना यांचे कौतुकास्पद सहकार्य लाभले असून या दोघांनीही प्रवाशाचा जीव वाचवण्यात मोलाचा वाटा उचलला. मध्य रेल्वेला त्यांच्या शौर्याचा कौतुक आहे. लाखो प्रवाशांचा सुरळीत आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी विविध सतर्क आणि धाडसी रेल्वे पुरुष आणि महिला २४x७ काम करत आहेत.