1.8 कोटी मतदारांची पाठ, निकाल फिरणार?

0

मुंबई –  लोकसभेच्या निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जूनला पार पडेल आणि ४ जूनला भारतात नेमकं कुणाचं सरकार येणार, हे स्पष्ट होईल. अनेक भागांमध्ये मतदान कमी झाल्याचं समोर आलं. निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार २०१९ च्या तुलनेत, यावेळी पहिल्या टप्प्यात देशभरात तब्बल १. ८ कोटी लोकांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे घटती मतदानाची आकडेवारी लोकशाहीसाठी चिंतेची बाब असल्याचं म्हटलं जात आहे.

१९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं. या टप्प्यात देशभरातील २१ राज्य आणि १०२ मतदारसंघांचा समावेश होता. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तब्बल १.८६ कोटी मतदार घटल्याचे दिसून येत आहे.२०१९ च्या निवडणुकीत ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं होतं. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार २०१९ च्या पहिल्या फेजमध्ये ९ कोटी १३ लाख ७९ हजार ४०९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

२०१९ मध्ये पहिल्या टप्पात ९१ मतदारसंघांमध्ये निवडणूक घेण्यात आली होती. तर २०२४ मध्ये १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं. या टप्प्यात ११ कोटी ५२ हजार १०३ मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. २०२४ च्या निवडणुकीत आधी म्हटल्याप्रमाणे यंदा १०२ मतदारसंघांमध्ये निडणूक घेण्यात आली. २०१९ आणि २०२४ या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाची तुलना केल्यास २०२४ मध्ये १.८६ कोटी मतांची घट दिसून येत आहे.

२०१९ च्या पहिल्या टप्प्यातील मतदारांमध्ये ४ कोटी ६४ लाख ३० हजार ६१४ इतक्या पुरुष मतदारांचा समावेश होता. तर ४ कोटी ४९ लाख २० हजार ५७१ इतक्या महिला मतदार होत्या. या निवडणुकीत १ हजार ३९५ तृतीयपंथीय मतदारांनी मतदान केलं होतं. निवडणूक आयोगाने फेब्रुवारीत प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये ८९.६ कोटी पात्र मतदार होते, तर २०२४ मध्ये ही संख्या वाढून ९६.८ कोटी इतकी झाली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech