बारामती – विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. सध्या सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवारांची एक सभा पार पडली. यावेळी त्यांनी राजकारणा नवीन चेहऱ्यांना संधी देण्यामागची कारण सांगितली. “राज्याचा चेहरा बदलला पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. त्यासाठी नवीन पिढी तयार केली पाहिजे. आम्ही लक्ष घातले. राज्याच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी, या ठिकाणी युगेंद्रची निवड केली. तसे राज्यात अनेक तरुण उभे केले. आम्ही महाराष्ट्रात नव्या नेतृत्वाची फळी उभी करण्याचा संकल्प केला आहे. तुमची मदत हवी”, असे शरद पवार म्हणाले.
“आताच्या सत्ताधाऱ्यांचे राज्यावर लक्ष नाही हे माझं स्पष्ट मत आहे. राज्यावर लक्ष द्यायचं म्हणजे काय करायचं तर शेती, त्याला पाणी, त्याला बी बियाणं, खतं औषधं, मालाला किंमत या सर्व गोष्टी शेतीसाठी करणं गरजेचं आहे. निव्वळ शेती एकी शेती करणं चालत नाही, पर्यायी शेती करणं कुटुंबासाठी चांगलं नाही. दोन मुलं असली की एकाने शेती करावी, दुसऱ्याने मिळेल तिथे काम केलं पाहिजे. सरकारने हाताला काम देण्यासाठी काम केलं पाहिजे. कारखानदारी आली की हाताला काम येईल”, असेही शरद पवारांनी म्हटले. “दोन मुलं असली की एकाने शेती करावी, दुसऱ्याने मिळेल तिथे काम केलं पाहिजे. सरकारने हाताला काम देण्यासाठी काम केलं पाहिजे. कारखानदारी आली की हाताला काम येईल”, असेही शरद पवारांनी म्हटले.