संत रवीदास यांच्या कार्याचा प्रभाव साडेसहाशे वर्षानंतरही कायम – माजी आमदार नरेंद्र पवार

0

कल्याणात संत शिरोमणी रवीदास जयंती उत्सव साजरा झाला

कल्याण : १६ व्या शतकातील भक्ती चळवळीचे भारतीय गूढ कवी-संत अशी ओळख असलेल्या संत शिरोमणी रवीदास महाराज यांच्या कार्याचा प्रभाव ६४८ वर्षानंतरही कायम असल्याचे उद्गार माजी आमदार नरेंद्र पवार यांनी काढले आहेत. संत शिरोमणी रवीदास सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून कल्याणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार बोलत होते.

संत शिरोमणी रवीदास महाराज यांनी आयुष्यभर आपल्या ईश्वरभक्तीच्या माध्यमातून तत्कालीन समाजातील असमानता, भेदभाव आणि अनिष्ट रूढी परंपरांवर बोट ठेवले. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या श्लोक आणि भक्तीगीतांतून समाजाला जागृत करण्याचेही काम केले. संत शिरोमणी रवीदास महाराज यांनी आपल्या जीवनात सामाजिक समता, बंधुत्व आणि भक्तीचाही संदेश दिला. त्यांच्या रचनांमध्ये ईश्वरभक्ती, मानवतावाद आणि सामाजिक न्याय यांचा समावेश असून आज तब्बल ६४८ वर्षानंतरही संत शिरोमणी रवीदास महाराज यांच्या कार्याचा प्रभाव कायम असल्याचेही नरेंद्र पवार यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech