मुंबई – बारामती लोकसभा मतदारसंघात नंणद सुप्रिया सुळे यांनी भावजय सुनेत्रा पवार यांना जोरदार धक्का दिला आहे. बारामती राखण्यात सुप्रिया सुळेंना यश मिळाले आहे. तर अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवारांचा पराभव झाला आहे. सध्या बारामतीत जल्लोष समोर आला आहे. बारामतीचा पराभव हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आज अजित पवार यांनी पत्राकार परिषद घेत लोकसभा निडणुकीच्या निकालावरील विविध मुद्यांवर भाष्य केले.
बारामतीचा निकालाबद्दल आश्चर्य वाटते. बारामतीकरांनी मला प्रचंड पाठिंबा दिला. मात्र यावेळी त्यांनी मला पाठिंबा कसा दिला नाही, माहिती नाही. लोकशाहीत जनमताचा कौल स्वीकारायचा असतो. आगामी विधानसभा निवडणुकीत सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीतील प्रमुख आहे त्यांच्याशी चर्चा करु, लोकसभा जागावाटपात त्रुटी राहिल्या. आम्ही कमी पडलो, म्हणून हरलो, असे अजित पवार यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांबाबत केलेले वक्तव्य लोकांना आवडले नाही. तेही बारामतीत येऊन, मी याआधी देखील यावर बोललो होतो. तसेच बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य आहे. कुठे कमी पडलो हे लोकांशी बोलल्यावरचे कळेल. विधानसभा निवडणूकीत त्या चुका टाळू असे अजित पवार म्हणाले. तसेच मुस्लिम समाज आमच्यापासून दूर झाला. संविधान बदलण्याचा विरोधकांनी प्रचार केला त्याला मागासवर्गीय घटकाने पाठिंबा दिला असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
महायुतीने सुरुवातीच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघात बैठका घेतल्या होत्या. त्यावेळी एका बैठकीत भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, या बैठकीनंतर शरद पवार यांना बारामतीमधून संपविणार. बारामतीमधून शरद पवार आणि त्यांचे राजकारण भाजपला संपवायचे आहे. चंद्रकांतदादांच्या या वक्तव्याचे त्यावेळी तीव्र पडसाद उमटले होते. त्यावेळी देखील अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर नाराजी दर्शवली होती.