जळगाव : मावळते सरन्यायाधीश चंद्रचुड हे उत्तम प्रचवचकार होते. तुम्ही मंदिरात जावून न्याय देतात असे माहिती असते, तर आम्ही तुम्हाला कधीच मंदिरात उचलून नेले असते. नुकतेच निवृत्त झालेले सद्या त्यांनी एक खुलासा केला की, मी राममंदिराच्या निर्णयापूर्वी मंदिरात गेलो होतो. कारण गेल्या अडीच वर्षांपासून आम्ही तुमच्याकडे न्यायाची मागणी करतो आहे, आता नवीन आलेल्या न्यायमूर्तीकडे आम्ही विनंती करतो की, तुम्ही तरी आम्हाला लोकशाही पद्धतीने न्याय द्या, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. चाळीसगाव येथे सोमवारी (११ नोव्हेंबर) पहिल्यादाच ठाकरे यांची जाहीर सभा झाली, याप्रसंगी ते बोलत होेते. व्यासपीठावर महाविकास आघाडीच्या उमेदवार उन्मेष पाटील, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजीव देशमुख, पाचारो येथील महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली सुर्यवंशी यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राममंदिर, संसद भवन, छ.शिवाजी महाराजा पुतळा या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. पुतळा पडला मोदींनी माफी मागीतली, परंतू अजुनही देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागीतली नाही. प्रत्येक सभेत मोदी-शहा माझा नावाचा जप करतात, तर देवेंद्र फडणवीस आमची हिम्मत काढतात, तुम्ही मला पोकळ धमक्या देवू नका, जाती-पातीचे राजकारण करुन तुम्ही समाजात दंगली घडवू पाहत आहेत. परंतू आता हिन्दु-मुस्लीम दंगल होत नसल्यामुळे, तुम्ही मराठा-ओबीसी, आदिवासी व इतर जातीमध्ये संघर्ष पेटविण्याचे काम करुन दंगली घडवू पाहत आहात, परंतू महाराष्ट्र आमची आई आहे, या संकट काळात तुम्ही माझ्या सोबत रहा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.