सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण

0

मुंबई- शेअर बाजारात आज सलग पाचव्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स ६१७ अंकांनी घसरून ७३,८८५ वर बंद झाला. तर निफ्टी २१६ अंकांनी घसरून २२,४८८ वर स्थिरावला. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ ७ शेअर्स आज वाढीसह बंद झाले. आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये आज सर्वाधिक १.३३ टक्क्यांनी वाढ झाली. ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि भारती एअरटेलचे शेअर्स सर्वाधिक वाढले. टेक महिंद्रा, पॉवर ग्रिड, बजाज फिनसर्व्ह आणि विप्रो यांचे शेअर्स घसरले. टाटा स्टीलचे शेअर्स २.२६ टक्क्यांनी घसरले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech