ठाणे : केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘पीएम गतिशक्ती’ अंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप (एनपीजी) च्या झालेल्या ८९व्या बैठकीत रस्ता, रेल्वे आणि मेट्रो क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांबाबत चर्चा पार पडली. यावेळी बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. सुमारे ३२.४६० किमी लांबीच्या या ब्राउनफिल्ड प्रकल्पामुळे मुंबई-पुणे-सोलापूर-वाडी-चेन्नई मार्गावरील वाढत्या प्रवासी आणि माल वाहतुकीमुळे होणाऱ्या विलंबावर उपाय तसेच कल्याण ते कर्जत येथील प्रवाश्यांच्या आणि मालवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांच्या कनेक्टीव्हिटीमध्ये वाढ होणार आहे. मध्य रेल्वेची वाहतूक अधिक गतिमान करण्यासाठी या दोन्ही रेल्वे मार्गिकांचा विस्तार प्रकल्प अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहे. यासाठी आदरणीय पंतप्रधान मा.ना.श्री. नरेंद्रजी मोदी साहेब आणि केंद्रीय रेल्वे मंत्री मा.ना.श्री.अश्विनी वैष्णव साहेबांचे खूप खूप आभार..!!