बारामतीच्या विकासाची परंपरा आता युगेंद्र पवार पुढे नेतील – शरद पवार

0

पुणे : देशाच्या कानाकोपऱ्यात गेला तरी बारामती म्हटल्यावर कुणाचं नाव घेतात? असा प्रश्न शरद पवारानी विचारताच बारामतीकरांकडून ‘शरद पवार, शरद पवार’ असा जल्लोष सुरू झाला. शरद पवार म्हणाले की, युगेंद्र पवार हे परदेशातून शिकून आले आहेत. आज ते बारामतीमध्ये समाजकार्य करतात. बारामतीकरांचा विकास करण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांना संधी द्या. बारामतीच्या विकासाची परंपरा आता युगेंद्र पवार पुढे नेतील, त्यांना विक्रमी मतांनी विजयी करा असं आवाहन शरद पवारांनी बारामतीकरांना केलं. युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी बारामतीमध्ये अखेरच्या टप्यातील प्रचाराची सांगता सभा घेतली.

शरद पवार म्हणाले की, “देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा. बारामती म्हटल्यावर कुणाचं नाव घेतात? आता युगेंद्र पवार तीच परंपरा कायम ठेवतील. त्यामुळे त्यांना विक्रमी मतांनी विजयी करा. आम्ही ज्या पद्धतीने विकास केला त्याच्यापेक्षाही अधिक जोमाने युगेंद्र पवार विकास करतील.” 1967 साली मला तुम्ही आमदार केलं. नंतर मुख्यमंत्री झालो. मला 30 वर्षे दिली. त्यानंतर अजित पवारांना संधी दिली. त्यांना आम्ही उपमुख्यमंत्री केलं. त्यांनी काम केलं. पण आता पुढच्या कामासाठी तरूण पिढीची गरज आहे. युगेंद्रची प्रश्न समजून घ्यायची तयारी आहे. काय करावं लागतंय हे त्यांना समजतंय. त्यांच्या काम करण्याची पद्धत बारामतीकरांना आवडेल. शरद पवार म्हणाले की, “महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली, पण गेल्या दोन वर्षांत 67 हजार महिलांवर अत्याचार झाला आणि 64 हजार मुली बेपत्ता आहेत. यावर उत्तर देण्याची धमक महायुतीच्या नेत्यांमध्ये नाही असं सांगत शरद पवारांनी महायुती सरकारवर तोफ डागली. शरद पवारांनी बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्यासाठी सांगता सभा घेतली. त्यामध्ये त्यांनी महायुतीवर जोरदार टीका केल्याचं दिसून आलं.”

गेल्या निवडणुकीला बारामतीकरांनी मोठं मताधिक्य दिलं. सुप्रिया सुळेंना साथ दिली. आता विधानसभेची निवडणूक होत असून त्यामध्येही काळजी घेण्याची गरज आहे असं सांगत शरद पवार म्हणाले की, “ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. बहिणीचा सन्मान करायचा असेल तर काही अडचण नाही. पण दोन वर्षांपासून महिलांवर किती अत्याचार झाले याची आकडेवारी मोठी आहे. आपल्या राज्यामध्ये 67,381 महिलांवर अत्याचार झाल्याचं समोर आलं. महाराष्ट्रामध्ये 64 हजार मुली बेपत्ता आहेत. जे म्हणतात लाडकी बहीण म्हणतात, त्यांना या 64 हजार मुली कुठे बेपत्ता झाल्या हे सांगण्यासाठी, .” यावर उत्तर देण्याची धमक महायुतीच्या नेत्यांमध्ये नाही असं सांगत शरद पवारांनी महायुती सरकारवर तोफ डागली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech