शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक कल्याणचे लोकप्रिय खासदार डॉ.श्रीकांत एकनाथजी शिंदे यांचा आज वाढदिवस. यानिमित्त श्रीकांतदादांना ठाणे जिल्ह्यातील सर्वधर्मीय लोकांतर्फे हार्दिक शुभेच्छा! श्रीकांतदादांना राजकीय,सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग यश लाभो,ही आई
जगदंबेच्या चरणी प्रार्थना!
उच्चविद्याविभूषित,बुद्धिमान
कर्तव्यदक्ष,प्रामाणिक,
एकवचनी,धाडसी,देखणा,
लोकाभिमुख दृष्टी लाभलेला तर,हिंदुत्वाची कास धरून राजकारणातून समाजकारण करणारा व्रतस्थ लोकनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व खासदारच्या रूपानं कल्याण -डोंबिवलीवासियांना लाभलं,ही मोठी भाग्याची गोष्ट आहे.सौ.लताताई एकनाथजी शिंदे या समाजसेवी मातेच्या उदरी ४ फेब्रुवारी १९८७ रोजी गोरगरिबांच्या जीवांचं रक्षण करणारा एक तेजस्वी आरोग्यदुत उदयास आला….त्याचं नाव…श्रीकांत
श्रीकांतदादांचं शालेय जीवनापासूनच डॉक्टर होऊन गोरगरिबांची सेवा करण्याचं स्वप्न होतं.कारण त्यांच्या मते,”रुग्णसेवा हाच खरा डॉक्टरचा धर्म आहे”. या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी खूप अभ्यास करून मोठं होण्याचा दृढनिश्चय केला. योगा-योगाने श्रीकांतदादांनी शालेय जीवनात घवघवीत यश प्राप्त केलं.१२ वीत सर्वाधिक गुण मिळाल्याने पिताश्री एकनाथजी शिंदे यांनी श्रीकांतला नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं. डॉक्टर होऊन समाजातील शेवटच्या माणसांची सेवा करायचं ध्येय मनाशी बांधून श्रीकांतदादांनी खूप अभ्यास केला. त्याची परिणिती म्हणजे दादांचे भाग्य उजळले. आधी ते एम.बी.बी.एस. झाले. त्यानंतर त्यांनी एम.एस.(आर्थो)ही पदव्युत्तर डिग्री मोठ्या गुणांनी संपादन केली. त्यामुळे दादांचे सर्वत्र कौतुक झाले.विद्यार्थी जीवनात दादा हे नेहमी अग्रेसर राहिले.
तथापि,समाजसेवेसाठी केवळ डॉक्टर होऊन चालणार नाही,तर त्यासाठी त्याला राजकारणाची जोड देण्याचे त्यांनी निश्चय केला. या पार्श्वभूमीवर धर्मवीर आनंद दिघेसाहेब आणि एकनाथजी शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यापुढे श्रीकांतदादांचा राजकारणात येण्यासंदर्भाचा विषय मांडला. त्याची दुर्दम्य इच्छा अन् उच्च शिक्षण पाहून त्याला बाळासाहेबांनी संमती दर्शविली. अन् लगेच शिवसेनेचे उमेदवार म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे यांना २०१४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघाचे तिकीट देण्यात आले. त्या निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार आनंद परांजपे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला, अन् ते १६ व्या लोकसभेतील सर्वाधिक तरुण खासदार म्हणून नावरूपाला आले. त्यावेळी ते एम.एस.च्या फायनल इअरला होते. म्हणजे एकीकडे मेडिकलचा अभ्यास अन् दुसरीकडे निवडणूक धुमश्चक्री ह्या गोष्टी त्यांनी नियोजनबद्धरित्या पार पाडून दोन्ही ठिकाणी यश संपादन केले. दादांनी खासदार होताच रुग्णसेवा अन् नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला. लोकोपयोगी कामे करून मतदारांचा विश्वास जिंकला. त्यामुळे ते २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत कल्याण मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून येऊन आपले प्रतिस्पर्धी बाबाजी पाटील यांचा त्यांनी दारुण पराभव केला. अन् १७ व्या लोकसभेचे खासदार म्हणून त्यांनी शपथ घेतली. इतकेच नव्हे तर,२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उबाठाच्या वैशाली दरेकर यांना सुमारे दोन लाखांहून अधिक मताधिक्याने पराभूत करत १८ व्या लोकसभेत त्यांनी खासदारकीची शपथ घेतली. अशाप्रकारे डॉ.श्रीकांत शिंदे यांनी विजयाची हॅट्रिक केली खरं पहाता,शिंदे पिता-पुत्र राज्यातील गोरगरीब,गरजू लोकांची तनमनधनाने सेवा करतात,त्याचं हे फळ आहे.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे कोरोना काळात दीड-दोन महिन्यांपासून कोटा,राजस्थान येथे अडकलेल्या राज्यातील सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने एस.टी.बसेसची व्यवस्था करून देत दादांनी त्यांना सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आपापल्या जिल्ह्यात रवाना केलं. त्याप्रमाणेच दिल्ली येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील यू. पी. एस. सी. च्या उमेदवारांची श्रीकांतदादांनी रेल्वेमंत्र्यांना विनंती करून परतीच्या प्रवासाची व्यवस्था केली.एवढं करून दादा थांबले नाहीत. सदर उमेदवारांचे रात्री चक्क २ वाजता कल्याण स्टेशनवर स्वागत करण्यास जातीने हजर राहिले. याला म्हणतात खरी समर्पणवृत्ती. अशा विविध संकटमय प्रसंगी खासदारसाहेबांनी केवळ आपल्या मतदारसंघाचा विचार न करता,साऱ्या महाराष्ट्राला मदतीचा हात दिला. वास्तवात हे खरं चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचं प्रतिक आहे.
बंधू-भगिनींनो,केवळ कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याला लाभलेलं हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी पिताश्री एकनाथजी शिंदे अन् मातोश्री सौ. लताताई शिंदे यांनी अतिशय कठोर परिश्रम घेतले, हे शब्दात वर्णन करणं कठीण आहे. परिवाराची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत, शिंदेसाहेबांनी आपलं १० वीनंतरचे शिक्षण अर्धवट सोडून,श्रीकांतदादांच्या उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं. दरम्यान एकनाथजी योगायोगाने धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या संपर्कात आले. अन् पहाता पहाता,प्रगतीची चक्रे फिरू लागली. भाईंच्या व्यक्तिमत्वातील निष्ठा, मेहनत,प्रामाणिकपणा व लोकसेवा करण्याची दुर्दम्य इच्छा हे पैलू पाहून दिघेसाहेब प्रभावित झाले अन् त्यांनी भाईंना विविध पदे बहाल केली,संधी दिल्या. तर भाईंनी त्याचं सोनं करून प्रत्येक पदाला न्याय दिला. एकनाथजी हे नगरसेवकपासून कॅबिनेट मंत्री,राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री झाले. ही खऱ्या अर्थाने राजकारणातून समाजकारण करण्याची फलश्रुती आहे.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे अन् धर्मवीर आनंद दिघे यांची भगवी प्रेरणा, आजोबा संभाजीराव शिंदे, आजी स्व.गंगूबाई शिंदे, आईवडील अन् काकांचे आशिर्वाद तर, धरमपत्नी सौ.वृषाली शिंदेचं भक्कम पाठबळ, चिरंजीव कु. रुद्रांशचे भावनिक प्रेम अन् सर्वधर्मीय लोकांच्या शुभेच्छा श्रीकांतदादांच्या पाठीशी असल्याने त्यांच्या हातून असंख्य जनहिताची कामे होताहेत व पुढेही होत राहतील, याचा आम्हा शिवसैनिकांना विश्वास आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भगव्या आशिर्वादाने तर, धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या प्रेरणादायी विचारातून भाई अन् दादांची राजकीय,सामाजिक अन् आध्यात्मिक जडणघडण झाली. समाजातील शेवटच्या माणसाला केंद्रबिंदू मानून राज्यातील गोरगरीब, निर्धन,गरजू लोकांचे महागडे ऑपरेशन्स मुंबई,ठाणे,पुणे येथील सुप्रसिद्ध हॉस्पिटल्समध्ये मोफत वा अल्पदरात व्हावेत, यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन अन् शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष हे हातात हात घालून रुग्णसेवेचं पवित्र काम मोठ्या तत्परतेने करताहेत ही कौतुकास्पद गोष्ट आहे.
स्वतः श्रीकांतदादा हे निष्णात डॉक्टर असल्याने अन् त्यास उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं पाठबळ मिळत गेल्याने डॉक्टरसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत राज्यात हजारहून अधिक महाआरोग्य शिबिरे आयोजित झाली असून, त्याचा लाखों लोकांना लाभ मिळाला, ही अतुलनीय गोष्ट आहे.त्यासह अपघाती व दुर्भर रोगांच्या रुग्णांना रक्ताची गरज भागविण्याच्या उद्देशाने श्रीकांतदादांनी जागोजागी रक्तदान शिबिरे आयोजित केली.इतकेच नव्हे तर,आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अशा सुमारे पन्नास हजारहून अधिक रुग्णांचे कॅन्सर,बायपास, एन्जिओप्लास्टी,मोतीबिंदू, ब्रेनट्युमर,लिव्हर ट्रान्सप्लांट, किडिनी ट्रान्सप्लांट आदी तत्सम ऑपरेशन्स मोफत वा अल्पदरात करून दिलेत. यास्तव सदर रुग्णांचे नातेवाईक व स्वतः रुग्णांनी डॉक्टरसाहेबांचे शतश: आभार मानून त्यांना दीर्घायुष्याची दुवा-आशिर्वाद दिलेत. वास्तवात हेच खरं रुग्णसेवेचं फलित आहे.
महत्वाचे म्हणजे कोरोना काळात खासदारसाहेबांनी चेस द व्हायरस या मिशनखाली कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सुमारे ४५ झोपडपट्ट्या कोरोनामुक्त केल्या. यास्तव तेथील गोरगरीब लोकांनी दादांना कृतज्ञतापूर्वक धन्यवाद दिले. माझे कुटुंब – माझी जबाबदारी या योजनेखाली खासदारसाहेबांच्या सूचनेनुसार कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य पथकांनी घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील लहान-मोठ्या सदस्यांची कोरोना व अन्य संसर्गजन्य आजारांची चाचणी करून कोरोनाविषयक जनजागृती केली. परिणामी सर्वधर्मीय नागरिकांनी घरात राहून कोरोनाशी लढा देण्यास पसंती दर्शविली. अन् त्यामुळे मोठी संभाव्य जीवित हानी टळली. वास्तवात हाच खरा डॉक्टरसाहेबांच्या वैद्यकीय ज्ञानाचा करिश्मा आहे. त्याचबरोबर श्रीकांतदादांतर्फे आपल्या लोकसभा मतदारसंघातील सुमारे ५५ हजारहून अधिक रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप केले. त्यातून लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत पडलेल्या रिक्षाचालकांना मोठा दिलासा मिळाला.यालाच खऱ्या अर्थानं राजकारणातून समाजकारण करणं म्हणतात.
इतकेच नव्हे तर,लॉकडाऊन काळात कामधंदे बंद पडल्याने सफाई कामगार, शेतमजूर,हातगाडीवाले, हमालमापाडी,लहानसहान व्यवसाय करणारे दिव्यांग (अपंग) स्त्री-पुरुष,घरकाम करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथी या सर्वांना डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, जेणेकरून त्यांच्या पोटाची खळगी भरून निघेल.याशिवाय श्रीकांतदादांकडून मास्क,सेनिटायझर आदी साहित्याचेही वाटप करण्यात आले,ज्यातून त्यांचा कोरोनाच्या संसर्गपासून बचाव होण्यास मदत झाली.याशिवाय डॉक्टरसाहेबांनी रस्त्यावर उतरून थेट कोरोनाशी लढा देणाऱ्या फ्रंटियर्स पोलीस,पत्रकार,सफाई कामगार यांची जागीच कोरोना चाचणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ते वैद्यकीय साहित्याचे वाटप केले.दरम्यानच्या काळात डॉक्टरसाहेबांनी लोकांच्या जिवांच्या रक्षणासाठी कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोविड १९ च्या टेस्टींग लॅब उभारल्या. वास्तवात श्रीकांतदादा हे खऱ्या अर्थाने रुग्णदुत तर आहेतच,त्याबरोबरच मानवतावादी लोकनेतेही आहेत.
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अन् डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन ह्या दोन्ही सेवाभावी संस्था शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटेसर हे राज्यातील गोरगरीब लोकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षातून वैद्यकीय मदत मिळवून देताहेत. त्याची परिणिती म्हणजे आज हे सर्व लाभार्थी आरोग्यदायी जीवन जगताहेत.वास्तवात यापेक्षा मोठं पुण्यकर्मच नाही, जे ना. एकनाथजी शिंदे,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे व ओएसडी मंगेश चिवटेसर या व्रतस्थ रुग्णदुतांच्या हातून अव्याहतपणे होत आहे.यासाठी आम्हा त्यांना हॅट्स ऑफ करतो.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडून गरजू लाभार्थ्यांना वैद्यकीय अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासंदर्भात मोलाचं मार्गदर्शन लाभत असल्याने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष,महात्मा फुले जनआरोग्य योजना,श्री सिध्दी विनायक ट्रस्ट,लालबाग राजा ट्रस्ट, कारो ट्रस्ट, चाईल्ड हेल्थ फाउंडेशन, जय गणेश ट्रस्ट,धर्मवीर आनंद दिघे संचालित जय अंबे मां ट्रस्ट यांच्यामार्फत गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळू लागली आहे. त्यामुळे गरजू,निर्धन लोकांचे महागडे ऑपरेशन मोफत होऊ लागले असून,त्यांच्यात जगण्याची एक नवी उमेद निर्माण होत आहे. याचं सर्वस्वी श्रेय दादांना जाते.
क्रीडा क्षेत्रात देखील दादा आघाडीवर आहेत. श्रीकांतदादांना फुटबॉल खेळण्याची खूप आवड आहे.या पार्श्वभूमीवर त्यांची ठाणे फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.उल्लेखनीय बाब म्हणजे लोकसभेच्या विविध विषयांवर आपले विचार ठामपणे मांडणाऱ्या खासदार *डॉ.श्रीकांत शिंदे यांची लोकसभेतील ४४८ सदस्यांमधील पहिल्या पाच सदस्यांत निवड झाल्याचे लोकसभा अध्यक्षांनी जाहीर करून त्यांचा गौरव केला.यास्तव त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ठाणे जिल्ह्यात असलेल्या बहुतांशी रेल्वे स्टेशनांवरील स्वयंचलित जिने,पादचारी पूल,रेल्वेपूल,लिफ्ट,सॅटिक, उड्डाणपूल आदी प्रकल्प प्रवाशांच्या सोयीसुविधां साठी खासदारसाहेबांच्या प्रयत्नातून उभारले गेलेत.याशिवाय प्रवाश्यांना कमी दरात शुद्ध पाणी मिळावे व त्यांची तहान भागावी,या उद्देशाने रेल्वे स्थानकांवर वॉटर डिस्पेन्सर सुरू केलेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक,गरोदर महिला,अपंग,लहान मुले यांना जागीच पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ लागले आहे.या सर्व वयोगटातील सदस्यांनी खासदारसाहेबांना कृतज्ञतापूर्वक धन्यवाद दिले.
डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाचे ठळक उदाहरण म्हणजे कल्याण येथील ऐतिहासिक पत्रीपुलाचे पुनर्निर्माण होय.कोरोनाची तमा न बाळगता,श्रीकांतदादा हे लॉकडाऊनच्या काळातही हैद्राबाद येथे जाऊन गर्डर निर्मितीची पहाणी करून आले.अखेर खासदारसाहेबांच्या अथक प्रयत्नांतून हैद्राबाद येथून गर्डर पाठविण्यात आले अन् १०४ वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालिन पत्रीपुलाचे नूतनीकरण होऊन त्याचे लोकार्पणही झाले.परिणामी वर्षानुवर्ष नागरिकांना होणारा वाहतूक कोंडीचा त्रास कायमचा मिटला.दळणवळणची उत्तम सोय झाल्याबद्दल कल्याण,डोंबिवली, उल्हासनगर आदी उपनगरांतील नागरिक व वाहनचालकांनी भाई-दादांचे शतश:आभार मानले. आधी करून दाखवतो,नंतर बोलतो हे शिवसेनेचं ब्रीद दादांनी कृतीने सिद्धीस आणले.
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची अभ्यासूवृत्ती,विविध विषयांची अनुभूती,गोरगरीब लोकांच्या आरोग्याबद्दल कणव,वैद्यकीय ज्ञान,सकारात्मक विचारसरणी,भाषांवरील प्रभुत्व या सर्व गुणवैशिष्ट्यांचा विचार करून त्यांची मा.लोकसभा अध्यक्षांकडून विविध केंद्रीय कमिटींवर सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.त्यात सदस्य स्टँडिंग कमिटी,आरोग्य/ कुटुंब कल्याण ; सदस्य,गृह निर्माण/नागरी व्यवहार; सदस्य,संरक्षण/डिफेन्स; सदस्य,कमिटी ऑफ व्हायलेशन ऑफ प्रोटोकॉल नोर्मस ऑफ गवर्नमेंट ऑफिसर्स विथ लोकसभा मेंबर्स यांचा समावेश आहे.दादांची वर्क इज वर्शिप ही विचारसरणी त्यांच्या यशाचं खरं गमक आहे.
कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गजन्य आजारांशी समर्थपणे मुकाबला करणे शक्य व्हावे,यादृष्टीने शिक्षणासह स्वास्थ्य या विषयावर राज्य सरकार व केंद्र सरकारने प्राधान्य देणे काळाची गरज आहे,असे मत खासदारसाहेबांनी लोकसभेच्या अधिवेशनात व्यक्त केले.कोरोना व अन्य संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर इंडियन फार्मासिट्युकल सेक्टर या महत्वपूर्ण क्षेत्राला अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे,याची त्यांनी लोकसभेत स्पष्टोक्ती केली.त्यामुळेच त्यांना
रुग्णदुत ची उपमा दिली जाते.
अंबरनाथ येथील प्राचीन काळातले शिव मंदिर आणि आसपासचा परिसराचे
सुशोभिकरणाचे काम करण्यात आले.अंबरनाथ हे टेंपल सिटी म्हणून विकसित करण्याचा शिंदे पिता-पुत्राचा मानस असून,त्यादिशेने कार्यवाही प्रगतीपथावर आहे.त्यास केंद्रीय पुरातत्व विभागाची मंजुरी मिळाली असून,त्यासाठीचा निर्धारित निधीदेखील मंजूर झाला आहे.आध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून जागतिकस्तरावर अंबरनाथ शहराची ओळख व्हावी,या उद्देशाने सदर तिर्थक्षेत्र विकसित केलं जात आहे.हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे अन् धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या हिंदुत्वाची सिंहगर्जना सदैव घुमत रहावी,यासाठी शिंदे पिता-पुत्र कटिबद्ध असून त्यांनी हिंदुत्वाशी नाळ अटूट ठेवली,याचा शिवभक्तांना सार्थ अभिमान आहे.मागील वर्षी शिव मंदिराच्या पवित्र प्रांगणात डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे शिव मंदिर आर्ट फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले होते.आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंतांनी येथे हजेरी लावत,आपल्या कलांचे सादरीकरण केले.सुप्रसिद्ध गायकांनी भक्तिपर गिते गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.आता हे शिवभक्ती स्थळ पर्यटन क्षेत्र म्हणून सुद्धा नाव रूपाला आले आहे.खासदारसाहेबांच्या प्रगल्भ राजकीय
इच्छाशक्तीमुळे प्राचीन अंबरनाथ शिवमंदिराचा कायापालट झाला.खरं तर, हीच खरी श्रीकांतदादांच्या हिंदुत्व विचाराची ओळख आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी
महाराजांच्या दुर्गे गुर्गेश्र्वर किल्ले रायगड येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अखंड पुष्पहार अर्पण करण्याचा पायंडा पाडण्याचा मान खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना जातो.आज या उपक्रमास ४ वर्षे पूर्ण होत आले आहेत.या अद्वितीय संकल्पनेची छत्रपती संभाजी महाराज यांनी डॉ.श्रीकांत शिंदे अन् मंगेश चिवटेसरांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि चिवटे बंधूंचे मुक्ताई गारमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे शिवछत्रपतींच्या ऐतिहासिक वैभवात आणखी एक मानाचा शिरपेच खोवला गेला आहे.अत: राज्यातील तमाम मराठमोळ्या लोकांकडून शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा!
याशिवाय अंबरनाथ-बदलापूर दरम्यान राहणाऱ्या चाकरमान्यांची प्रवास सेवा सुखकर व्हावी,या उद्देशाने खासदारसाहेबांनी रेल्वे मंत्रालयाकडे मागणी करून चिखलोली स्थानक उभारण्याचा दादांचा मानस आहे.खासदारसाहेबांच्या प्रयत्नातून एरोली-काटई मार्गे उन्नत मार्गाच्या बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे.सदर महत्त्वाकांक्षी प्रकल्प एमएमआरडीएमार्फत कार्यान्वित होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा मनस्ताप नाहिसा होऊन मुंबई,नवी मुंबई,ठाण्याचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. आपल्या मतदारसंघातील विकास कामांना गती मिळावी,यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिल्याने रस्त्यांसाठी माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून ३६० कोटी,तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ४२० कोटी रुपये मंजूर करण्यात त्यांना यश आले.ठाणे जिल्ह्यातील सर्वधर्मीय नागरिक तथा उपनगरी लोकल गाड्यांच्या प्रवाशांसाठी उत्तम प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदारसाहेब सदैव प्रयत्नशील असतात. त्यामुळेच त्यांना जनमानसात कार्यसम्राट म्हणून संबोधिले जाते.
कोविड-१९ या महामारीच्या काळात कोरोनाग्रस्त रुग्णांची हॉस्पिटलमधून ने-आण करण्याची सोय व्हावी अन् त्यांच्यावर तातडीने औषधोपचार व्हावेत,या उद्देशाने डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे जात,धर्म,पंथ,पक्षाभिनिवेश बाजूला सारून राज्यात सुमारे ३०० रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात आले. याशिवाय कोरोनाग्रस्त रुग्णांना खासदारसाहेबांनी वेळीच रुग्णालयात बेड, रुग्णवाहिका,ऑक्सिजन, रेमडीसिव्हर इंजेक्शन उपलब्ध करून दिल्याने असंख्य लोकांचे जीव वाचलेत.संकटसमयी आपल्या जीवाची पर्वा न त्यांनी लोकांचे प्राण वाचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केलेत. परिणामी श्रीकांतदादांना दोन वेळा कोरोनाची लागणही झाली.तथापि त्याची तमा न बाळगता,कोरोनातून बरे होताच तू रणांगणातला वीर..सोडू नकोस धीर.. या पार्श्वभूमीवर त्यांनी कोरोना विरुद्धचा लढा पुढे असाच अविश्रांत चालू ठेवला. हे तर त्यांच्या क्षत्रिय बाणा चं खरं लक्षण आहे.
श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मतदारसंघांमधील ५६ गावातील ५१ हजार कुटुंबांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जलजीवन मिशन योजनेंतर्गत सोडवून दिला.या योजनेची किंमत सुमारे ६५ कोटी एवढी आहे.घरोघरी पाण्याची सोय झाल्याने येथील ग्रामस्थांनी दादांचे मनस्वी आभार मानले. या अन् अशा अन्य लोकोपयोगी कामांच्या आधारावर खासदारसाहेबांना मागील वर्षी संसदरत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.त्याचप्रमाणे युवा नेते या भूमिकेतून त्यांनी शिक्षण,क्रीडा,रोजगार,युवा कल्याण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल झी युवा वाहिनीने खासदारसाहेबांना संसदरत्न शिवाय लीडरशिप फॉर सोशल चेंज अवॉर्ड; वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन अवॉर्ड ; आदर्श खासदार पुरस्कार अन् नरवीर तानाजी मालुसरे पुरस्कार -२०२१ देऊन सन्मानित केले आहे.याबद्दल डॉ.श्रीकांत शिंदे यांचे तमाम शिवसैनिकांतर्फे मन:पूर्वक अभिनंदन!
डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्यावतीने ना.एकनाथजी
शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे येथील सुप्रसिद्ध ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दरवर्षी राज्यातील गोरगरीब लोकांच्या पाल्यांचे हृदयाच्या छिद्रांचे मोफत ऑपरेशन करून देण्यात तर आहेत.गेल्या नऊ वर्षात याच दिनी सुमारे ५००० मुला-मुलींच्या शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या आहेत.आज ही मुलं-मुली निरोगी जीवन जगत आहेत.हे सत्कर्म म्हणजे राजकारणातून समाजकारण करण्याचं द्योतक आहे.माननीय एकनाथजी शिंदे यांच्या षष्ठ्यब्धिचं म्हणजेच वयाची ६० वर्षे पूर्ण केल्याचे औचित्य साधून ठाणे स्थित ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये येत्या २ फेब्रुवारी रोजी ६० बालकांच्या हृदयावर मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.वास्तवात यापेक्षा मोठं पुण्यकर्मच नाही.वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून श्रीकांतदादा लोकसेवेचं व्रत तनमनधनाने पुढे चालवत आहेत.खऱ्या अर्थाने हेच आदर्श लोकनेत्याचं प्रतिक आहे.सन्माननीय खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची राजकीय-सामाजिक – वैद्यकीय क्षेत्रांत उत्तरोत्तर प्रगती होवो,अशी सदिच्छा आम्ही ठाणे जिल्ह्यातील सर्वधर्मीय लोक व्यक्त करतो.अन् वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
जय हिंद!
जय महाराष्ट्र
“मंजिले उन्हीको मिलती है,जिनके सपनों में जान होती है”
“पंख से कुछ नहीं होता,हौसलों में उडान होती हैं”
लेखक-रणवीर राजपूत
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष/डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन,महा.राज्य
(मो.न.९९२०६७४२१९)