निवडणूक निकालानंतर काँग्रेस आणि आपवर टीका
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेसचा धुव्वा उडाल्यानंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी दोन्ही पक्षांवर टीका केली आहे. “आपसात आणखी लढा..” अशा शब्दात अब्दुल्लांनी ट्विटरवर संदेश जारी करत टोला लगावला आहे. आम आदमी पक्षासाठी अस्तित्वाची लढाई तर भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत. येथील मतमोजणीत भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मतमोजणी सुरु असताना नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोशल ट्विटरवर (एक्स) सूचक पोस्ट केली आहे. ओमर अब्दुल्ला यांनी ‘महाभारत’ मालिकेतील एक दृश्य शेअर करत लिहिले आहे की, ‘आपसात आणखी लढा!’. त्यांची ही पोस्ट दिल्लीत काँग्रेस आणि ‘आप’ने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या निर्णयाकडे अंगुली निर्देश करणारी असल्याचे मानले जाते.