धुळे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचाराची पहिली सभा आज धुळे शहरात झाली. महाराष्ट्रात येवून संविधान रक्षणाची भाषा करणारे कॉंगे्रस नेते, जम्मू काश्मिरमध्ये मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान लागू करण्यास विरोध करुन कलम ३७० पुन्हा आणण्याची भाषा करीत आहे. पण जो पयरत मोदीला जनतेचा आशिर्वाद आहे तो पयरत जगातली कोणतीच ताकद जम्मू काश्मिरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करु शकणार नाही. आदिवासी, दलित, ओबीसी समाजघटकांची एकजुटता तोडण्यासाठी कॉंग्रेस जाती जातीमध्ये फुट पाडण्याचा, विभाजीत करण्याचा कुटील खेळ कॉंगे्रस खेळत आहे. कॉंगे्रसने असेच धर्माच्या नावावर षडयंत्र केले होते. तेव्हा देशाचे विभाजन झाले होते आणि आता जाती जातीच्या नावावर ते भांडणे लावून तुमची एकजुटता तोडू पहात आहे. पण जनतेने एकजूट रहावे, एकत्रित राहिलो, तरच सुरक्षित राहू, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंगे्रससह महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचाराची पहिली सभा आज धुळे शहरात झाली. या सभेत प्रधानमंत्री मोदी यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती सरकारने केलेल्या कामांची जंत्री सादर करतांनाच महाविकास आघाडीच्या विरोधात टिकेची झोड उठवली. धुळे शहरातील खान्देश गोशाळा मैदानावर झालेल्या या जाहिर सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, महाराष्ट्राचे मंत्री दादा भुसे, अनिल पाटील, माजी मंत्री डॉ.सुभाष भामरे, धुळे शहर विधानसभेचे उमेदवार अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीणचे उमेदवार राम भदाणे, साक्रीच्या शिवसेना उमेदवार मंजूळा गावीत, आ.जयकुमार रावल, शिरपूरचे उमेदवार काशिराम पावरा, माजी मंत्री अमरिश पटेल आदी उपस्थित होते.
या जाहिर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. त्यांनी धुळे शहराची ग्राम दैवत एकविरा देवीला तसेच आदिवासींचे आराध्य दैवत यहामोगी मातेला वंदन केले. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, राज्यातील महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विकासाला गती दिली आहे. तुम्हाला ही आठवण ठेवावे लागेल, महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. औद्योगिक विकास, परकिय गुंतवणूक मिळवण्यात महाराष्ट्रा पहिल्या नंबरवर राहीला आहे. मागिल तीन महिन्यात सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. देशातला सर्वात मोठा पोर्ट वाढवण बंदर महाराष्ट्रात बनत आहे. पायाभुत सुविधांचे प्रकल्प महाराष्ट्रात तयार होत आहे. वाढवण बंदराच्या भुमिपुजनाला आलो होतो. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला म्हणाले होते की, तेथे एक विमानतळ बनवा, तेव्हा मी शांत राहिलो पण महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार बनेल तेव्हा ही मागणी पुर्ण करण्यात येईल, अशी घोषणा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. महायुतीच्या वतीने जाहिर करण्यात आलेल्या १० संकल्पांचा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जुन उल्लेख केला.