पाकिस्तानात ट्रेन ‘हायजॅक’, १२० प्रवाशी ओलीस, ६ सैनिक ठार

0

लाहोर : पाकिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाकिस्तानातील बलोच लिबरेशन आर्मीनं एक संपूर्ण रेल्वेच हायजॅक केली आहे.या ट्रेनमध्ये सुमारे 400 प्रवासी होते. बलूचिस्तानमधील स्वतंत्र गट बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत, ट्रेनवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे.बीएलएच्या दाव्यानुसार, या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे सहा जवान ठार झाले असून, त्यानंतर १०० हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले आहे.पाकिस्तानी सैन्य या ओलीसांची सुटका करण्याचे प्रयत्न करत आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार ही ट्रेन पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम बलूचिस्तान प्रांतातील क्वेटा येथून खैबर पख्तूनख्वाच्या पेशावरकडे जात असताना ही घटना घडली आहे. बलूच लिबरेशन आर्मी या दहशतवाद्यांनी आज, मंगळवारी सुमारे ४०० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनवर हल्ला केला, ज्यात ट्रेन चालक जखमी झाला. पाकिस्तानी सैन्याने कोणत्याही लष्करी कारवाईचा प्रयत्न केला, तर सर्व ओलीसांना ठार मारू आणि या मृत्यूची जबाबदारी संपूर्णपणे लष्करावर राहील, अशी धमकीही बीएलएने दिली आहे.

पाकिस्तान सरकारविरोधात दीर्घकाळ लढणाऱ्या बीएलएने ट्रेन हायजॅक केल्यानंतर निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी सांगितले की, ओलीसांमध्ये पाकिस्तानी सैन्याचे जवान आणि सुरक्षा एजन्सीचे सदस्य आहेत. आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर ओलीसांना गंभीर इजा पोहोचू शकते, असा इशारा बीएलएने दिला आहे. बीएलएने सांगितले की, त्यांनी ट्रेनमधील महिला, मुले आणि बलूच प्रवाशांना सोडून दिले असून, ओलीस ठेवलेले सर्वजण पाकिस्तानी सैन्याशी संबंधित आहेत

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech