अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यातील ३ रेल्वे स्थानकांचा कायापालट

0

अमरावती : भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत राज्यातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील तीन रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच बडनेरा रेल्वे स्थानकाला ३६.३ कोटी आणि धामणगाव रेल्वे स्टेशनला १८ कोटी रुपयांचा निधी दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यासाठी देण्यात येणार आहे.या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री वैष्णव यांचे आभार मानले.

या योजनेत समाविष्ट काही महत्त्वाची स्थानके म्हणजे अमरावती आणि ग्रामीण भागातील स्थानकांमध्ये बडनेरा आणि धामणगाव रेल्वे यांना स्थान देण्यात आले आहे.या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.या पुनर्विकासात स्थानकांची नावे आणि त्यासाठीचा निधी पुढीलप्रमाणे आहे. बडनेरा (३६.३ कोटी), धामणगाव स्टेशन (१८ कोटी) निधी देण्यात येणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech