ठाणे : सह्याद्रीच्या पर्वतरांगा पालथ्या घालुन विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोनचे प्रशिक्षक आणि ट्रेकर्स हिमालयाला गवसणी घालण्यासाठी गेले होते. प्रत्येक ट्रेकर्स चे स्वप्न असते की एकदा तरी एव्हरेस्ट बेस कॅम्प, अन्नपूर्णा बेस कॅम्प, केदारकांथा, चंद्रथाल अशा काही प्रकारचे हिमालयीन ट्रेक करावेत. परंतु त्यासाठी लागणारी शारीरिक मेहनत, आणि फिटनेस हि या प्रत्येक ट्रेकची सर्वात महत्त्वाची पायरी असते. अतिशय कमी तापमान आणि पाठीवर ट्रेकिंगची बॅग घेऊन वर चढताना अतिशय दमछाक होत असते. हिमालयात हाय अल्टिट्यूड वर ट्रेकिंग करत असताना सर्वांत कठीण अडचण येते ती म्हणजे ऑक्सिजन ची कमतरता. त्या साठी अनुकूल वातावरणात सराव करणे आवश्यक असते. याच सराव कामगिरीचा पहिला टप्पा म्हणजे अन्नपुर्णा आणि धौलागिरि हिमालयीन पर्वत रांगेत असलेला पुन हिल ट्रेक (३,२१०M) या ठिकाणी पोहोचण्यासाठी ३ दिवसाचा वेळ लागतो.
विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन च्या ट्रेकर्स नी नेपाळ येथील पोखरा येथून या ट्रेकची सुरुवात केली. पहिल्या दिवशी ६ ते ७ तास ट्रेक केल्यावर उल्लेरी (१,८०० M) इतक्या उंचीवर पोहोचून पहिला स्टे केला. दुसऱ्या दिवशी घोरेपणी (२,८५० M) या ठिकाणी पोहोचण्यासाठी ४ ते ५ तासांचा ट्रेक करावा लागला या ठिकाणी पोहोचत असताना अनेक खडतर ट्रेकिंग रूट चा सामना सर्वांना करावा लागला घोरेपाणी या ठिकाणी दुसऱ्या दिवशीचा स्टे करून तिसऱ्या दिवशी पहाटे योग्य वातावरण पाहून शेवटचा टप्पा गाठायचा होता तो म्हणजे पुन हिल ट्रेक (३,२१० M) या ठिकाणाहून अन्नपुर्णा, धौलागिरि, निलगिरी अशा अनेक ६,००० ते ८,००० M उंचीवर असलेल्या अनेक हिम शिखरांचे दर्शन घडते. हिमालयीन ट्रेकिंग च्या दृष्टिकोनातून हा ट्रेक अतिशय महत्वाचा असुन टिटवाळा येथील ट्रेकर्स नी प्रथमच हा ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण करून पुन हिल च्या शिखरावर तिरंगा फडकवला.
विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन चे संचालक आणि मुख्य प्रशिक्षक श्री विनायक कोळी सर, क्रीडा प्रशिक्षक व अनुभवी ट्रेकर श्री हरीष वायदंडे सर, महिला स्वसंरक्षण प्रशिक्षिका कु. हर्षदा पाडेकर आणि गौरी तिटमे यांनी हा हिमालयीन ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला असुन हे ट्रेकर्स लवकरच माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प साठी सज्ज होणार आहेत.