भारतातील दोन लाख एक्स खात्यांवर बंदी

0

न्यूयॉर्क – जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांची कंपनी एक्सने सुमारे २ लाख ३० हजार ८९२ एक्स खात्यांवर बंदी घातली आहे. यातील २लाख २९ हजार ९९५ खाती लहान मुलांचे शोषण आणि नग्नतेला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली बंद करण्यात आली आहेत. ९६७ खाती दहशतवादाला पाठिंबा दिल्याच्या आरोपाखाली हटविण्यात आली आहेत.

२६ एप्रिल ते २५ मे या कालावधीत कंपनीला एक्स वापरकर्त्यांच्या सुमारे १७ हजार ५८० तक्रारी आल्या होत्या, असे एक्सने आपल्या अहवालात म्हटले आहे. यापूर्वी २६ मार्च ते २५ एप्रिल या काळात एक्सने भारतातील जवळपास १ लाख ८४ हजार २४१ खात्यांवर बंदी घातली होती. यातील १ हजार ३०३ खात्यांवर दहशतवादाला खतपाणी घातल्याच्या कारणावरून कारवाई करण्यात आली होती; तर २६ फेब्रुवारी ते २५ मार्च या काळातील सुमारे २ लाख १२ हजार ८६२ भारतीय एक्स खात्यांवर बंदी घातली होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech