सिंधुदुर्ग : महाराष्ट्र जिंकला की दिल्ली सुद्धा हलेल, त्यामुळे महाराष्ट्रातून दिल्लीचं तख्त हलवू. बारसू रिफायनरी होऊ देणार नाही, हे माझं वचन आहे. पर्यावरणाचा रक्षण करून विकास करेन. राणे बाप-लेक महाराष्ट्र द्रोही, यांच्याशी भांडायला आम्ही आलो नव्हतो. सावंतवाडीचे दीपक केसरकर नथदृष्ट आहेत. दीपक केसरकर जेव्हा पराभूत होतील तेव्हा कोकणाचा चांगला विकास होईल. राज्यातील सरकारच्या मदतीने महाराष्ट्रातील सगळे उद्योग धंदे गुजरातला नेऊन आपल्या अशुभ हाताने शिवरायांचा पुतळा उभारणारे ही अवलाद, अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. अशुभ हाताने शिवरायांचा पुतळा उभारणा्यांचे दिल्लीतील तख्त हलवू अशी गर्जना कणकवणीत आयोजित सभेत उद्ध्व ठाकरे यांनी केली.
अजित पवार म्हणाले की गौप्यस्फोट करतो, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी किंवा बनवण्यासाठी जी बैठक झाली त्यात उद्योगपती होते. आता तुम्ही ठरवा हे पन्नास खोके कुठून आले? एका उद्योगपतीने मुंबई घशात घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत, कोकण पण घशात घालतील. ठाकरे पुढे म्हणाले, मोदी म्हणजे शिवाजी महाराजांचे भक्तच, इथली जनता मोदींनी महाराजांचा पुतळ्याच उद्घाटन केला त्यामुळे भुलली. आठ महिन्यात यांचा आव कोसळला. महाराजांचा पुतळा नसून त्यात आमचा देव आहे. मोदींना एवढ्यासाठी बोलवा, वडिलांना आणि मुलांना खांद्यावर बसून घराणेशाही सुरू आहे. आमची शिवसेना प्रमुखांची घराणेशाही यांना चालणार नाही. मोदींवर कोणते संस्कार आहेत, आमच्या वडिलांचा अपमान करतात.
हेलिकॉप्टर न जाता रस्त्याने येऊन दाखवा, असं आव्हान देता. पहिल्यांदा इथले रस्ते नीट बनवा. त्यांच्या साईज प्रमाणे खात मिळालं होतं, सूक्ष्म खातं असं म्हणत ठाकरेंनी राणेंना टोलाही लगावला. माझ्या शिवसेनेला जो कोणी नकली बोलेल तो बेअकली आहे. भाजपच्या लेखी शिवसेना संपली असं मत, मग एवढे लोक का जवळ येतात. श्रीधर नाईक चौक पाहिल्यानंतर अंगावर शहर आले. सावंतवाडीचे नतद्रष्ट सांगतात, वाईटातून काहीतरी चांगलं होतं. महाराजांचा पुतळा पडल्यानंतर आणखी काहीतरी चांगलं होईल, असं तो दिवटा म्हणाला. यांना जोडे नाही मारायचे तर काय करायचं? महाराजांचा पुतळा पडल्यानंतर त्यातून काही चांगलं होईल म्हणतोस तू? महाराजांचा पुतळा पडला म्हणून चांगलं होणार नाही. केसरकर आणि इथला यांचा दिवटा पडला तरच माझ्या कोकणचा विकास होईल, असं ठाकरे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा म्हणजे आमचा आत्मा आहे.. आमचा देव आहे तो.. आठ महिन्यात पुतळा पडतो आणि आपले मिंधे दाढी खाजवत सांगतात की, वारा एवढा होता की, तो पुतळा कोसळला.. लाज वाटली पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.