सिंधुदुर्ग – मालवण- राजकोट येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर १ सप्टेंबरला मराठा नेते मनोज जरांगे हे मालवण येथे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष एड. सुहास सावंत यांनीआज सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान पुतळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या ता २९ ला सकाळी साडे दहा वाजता निवेदन देवून निषेध नोंदवण्यात येणार असून त्यामुळे सावंतवाडी राजवाड्यात सर्व मराठा बांधव व शिवप्रेमी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी अभिषेक सावंत पुंडलिक दळवी मनोज घाटकर संजय लाड प्रसाद राऊळ आनंद गवस नंदू विचारे शिवा गावडे श्रीपाद सावंत राजे प्रतिष्ठानचे खजिनदार ज्ञानेश्वर पारधी आदी उपस्थित होते
यावेळी सावंत पुढे म्हणाले, पुतळा उभारण्याची जबाबदारी नौदलाकडे होती तर बांधकामासाठी सिंधुदुर्गमधून मधून सहा कोटी रुपये खर्च का केले ? राज्य शासनाने हा निधी का दिला आहे ? हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे, असा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला. दरम्यान याप्रकरणी माहितीच्या अधिकारात कागदपत्रे घेऊन जनहित याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
पुतळा उभारताना रीतसर परवानगी घेण्यात आल्या नव्हता. कलासंचालनाने अधिकृत मान्यता दिलेली नाही. दरम्यान अजित पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये शिल्पकार जयदीप आपटे व स्ट्रक्चरर चेतन पाटील यांना पुतळा बनवण्याचा कोणतेही अनुभव नव्हता असे असताना शो-बाजी केल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला. तर त्या प्रकरणाची कागदपत्रे सार्वजनिक करावी, पुतळा पडणे ही राज्याला काळीमा फासणारी गोष्ट असल्याचे ऍड. सावंत यांनी सांगितले. शंभर कोटींचा पुतळा उभारण्याची तुमची पात्रता नाही आम्ही लोक वर्गणीतून तो नक्कीच उभारू असेही ते म्हणाले.