नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे सुरु होण्याकरिता तातडीने पावले उचलावी – वाजे

0

नाशिक – नाशिक मतदार संघातील रखडलेल्या नाशिक -पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प नाशिक- सिन्नर-संगमनेर नारायणगावं राजगुरूनगर व चाकण या भागातून जात असून या प्रकल्पाच्या पूर्णत्वाने कृषी, पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्रांना मोठा फायदा होणार असून या परिसरातील तसेच महाराष्ट्राच्या अर्थव्यस्थेत देखील परिवर्तन घडून आणण्याची क्षमता या प्रकल्पात असल्याने हा प्रकल्प तातडीने पूर्ण होण्याची आवश्यकता आहे.

नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे हा प्रकल्प बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असून हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास या परिसरातील अर्थ व्यवस्थेत मोठा बदल होणार असून या कामी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेच्या सुरु असलेल्या अधिवेशनात जोरदार पणे मांडली.

या प्रकल्पाचा आणखी एक पैलू म्हणजेहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गतसेच प्रस्तावीत सुरत चेन्नई महामार्ग या प्रकल्पाला छेडत असल्याने नवीन आर्थिक विकासाचा मार्ग तयार होणार असून पश्चिम आणि उत्तरेकडील प्रदेशांना दक्षिणेकडील प्रदेशांना जोडणार आहे. यामुळे दोन्हीही प्रदेशातील अंतर कमी होणार आहे.ट तातडीने नाशिक -पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग पूर्णत्वास न्यावा. अशी मागणी खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेच्या अधिवेशनात केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech