अमेरिकेने रोखली भारताची १.८८ अब्ज रुपयांची मदत, डॉजने दिली एक्स अकाऊंटवर माहिती

0

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीचं अमेरिकेला दौरा केला होता. यावेळी मोदींनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची तसेच अमेरिकेचे अब्जाधीश एलन मस्क यांची भेट घेतली होती.या भेटीदरम्यान वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच वेगवेगळे आश्वासन देण्यात आले. परंतु, पंतप्रधान मोदी भारतात परतत नाहीत तोच अमेरिका डॉजने भारताला देण्यात येत असलेली १.८८ अब्ज रुपयांची मदत रोखली आहे. डॉजने आपल्या एक्स अकाऊंटवर याची माहिती दिली आहे.

डॉजने आपल्या एक्स अकाऊंटवर अमेरिकेच्या करदात्यांच्या पैशांचा वापर खालील बाबींवर करायचा होता, जे सर्व रद्द करण्यात आले आहेत, अशाप्रकारचे ट्विट करण्यात आले आहे. भारतातील निवडणुकांमध्ये मतदारांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी भारताला १ अब्ज ८२ कोटी रुपये (२१ दशलक्ष डॉलर्स) एवढा प्रचंड निधी दिला जात होता. तो आता बंद करण्यात आला आहे. आता भारताला हा निधी मिळणार नाही. अमेरिकेने बांगलादेश आणि नेपाळचाही काही दिवसांपूर्वी निधी रोखला आहे.

अमेरिकेच्या नागरिकांचा जो करातून येणारा पैसा इतर देशांवर वायफळ खर्च केला जात आहे, तो रोखण्याचे काम ट्रम्प यांनी मस्क यांच्यावर सोपविले आहे. त्यांच्या नेतृत्वात सरकारी दक्षता विभाग (DOGE) यावर काम करत आहे. या डॉजने भारताला देण्यात येत असलेली १.८८ अब्ज रुपयांची मदत रोखली आहे. महत्वाचे म्हणजे अशाप्रकारचे निर्णय मस्क परस्पर घेऊ शकत नाहीत. माझ्या मान्यतेशिवाय मस्क कोणतेही निर्णय घेऊ शकत नाहीत, असे काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते. यामुळे मस्क यांनी सुचविलेला हा निर्णय ट्रम्प यांच्या संमतीनेच जारी करण्यात आला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech