मुंबई – न्यायालयाने सरकारच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यामुळे राज्यभरातील महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या या योजनेला न्यायालयीन पाठिंबा मिळाल्याने सरकारला मोठा राजकीय फायदा होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील आव्हान फेटाळल्यानंतर राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे योजना लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, पहिला हप्ता १४ ऑगस्टला सरकारी तिजोरीतून दिला जाणार आहे. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करत, राज्यातील महिलांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी या निर्णयामुळे योजनेची विश्वासार्हता वाढल्याचे सांगितले आहे.