नवी दिल्ली : वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर होऊ नये यासाठी विरोधक प्रयत्नरत होते. तसेच विधेयक आणल्यास सरकार पडेल असे म्हंटले जात होते. परंतु, आता संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक बहुमताने मंजूर झाले असून हा ऐतिहासिक दिवस असल्याचे प्रतिपादन वक्फ दुरुस्ती विधेयकावरील जेपीसीचे अध्यक्ष खासदार जगदंबिका पाल यांनी केले. यासंदर्भात पाल म्हणाले की, विरोधकांचे तुष्टीकरण धोरण उघड झाले आहे. संपूर्ण देशातील सामान्य गरीब ओबीसी, पसमंदा मुस्लिम समुदायाला हे समजले आहे की वक्फ विधेयकातील ही दुरुस्ती आपल्या फायद्याची आहे. कारण सरकारने केवळ स्पष्टपणे कायदा बनवला नाही तर तो जेपीसीकडे सोपवला आहे जेणेकरून सर्व भागधारकांशी चर्चा करता येईल.
खासदार जगदंबिका पाल म्हणाले की, आम्ही संविधानानुसार हे विधेयक मंजूर केले आहे, ज्यामुळे आजचा दिवस निश्चितच ऐतिहासिक बनतो. विरोधी नेत्यांवर निशाणा साधत ते म्हणाले की, निषेध करणाऱ्यांसाठी हा काळा दिवस असू शकतो. वक्फचा सण हा देशातील मुस्लिमांसाठी ईद सारखाच एक सण आहे. विरोधी पक्ष दिवा स्वप्न पाहत असून आज इंडी आघाडीच्या बाजूने कोणीच उभे नाही. जेडीयूचे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू त्यांना सोडून गेले आहेत. ममता बॅनर्जी काँग्रेसच्या विरोधात गेल्या आहेत, मग त्यांच्यासोबत कोण आहे? ज्याप्रमाणे दिल्ली, हरियाणा आणि महाराष्ट्रात कमळ फुलले आहे, तसेच पश्चिम बंगालमध्येही कमळ फुलेल असे पाल यांनी सांगितले.