नाशिक : ज्यांनी बेइमानी केली त्यांना बेईमान म्हणायचं नाही तर काय म्हणायचं. एखादा कलाकाराने कलेच्या माध्यमातून मांडले असेल तर चिंता वाटण्याचे कारण नाही, अशी कोपरखिळी उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावली आहे. उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सोमवारी नाशिक दौऱ्यावरती आले होते. यावेळी त्यांनी नाशिकमध्ये होणाऱ्या शिवसेनेच्या दोन दिवसीय विभागीय शिबिरा संदर्भामध्ये आढावा घेतला प्रत्यक्ष पाहणी केली. नवीन पदाधिकाऱ्यांची नियोजनाबाबत चर्चा केली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेमध्ये विसंवाद आहे असं नाही तर कोणी काही सांगत असेल पण असे नाही असे त्यांनी स्पष्ट केले. बोलताना ते म्हणाले की गद्दारांना गद्दार नाही म्हणायचे तर काय म्हणावे ज्यांनी बेमानी केली त्यांना बेईमान नाही म्हणायचे तर काय म्हणायचे. रिक्षावाल्यांना रिक्षावाला म्हणायचं नाही का हे गद्दार गोहाटीला गेले मग तो इतिहास बदलायचा का प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोपरखेही देताना म्हटले की, एखाद्या कलाकाराने कलेच्या माध्यमातून जर असे विचार मांडले असेल तर त्यांना चिंता वाटण्याचे कारण नाही. कारण ती खरी वस्तुस्थिती आहे आणि ती संपूर्ण देशाला माहिती आहे मग चिंता कसली करतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावरती आले होते. त्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, नाशिकच्या बाबतीत नेहमी मुख्यमंत्र्यांनी घोषणाच केल्या प्रत्यक्षात ज्या घोषणा केल्या ती कामे झाली आहे का असा प्रश्न उपस्थित करत नाशिक करावीमध्ये काम न झाल्याने मोठ्या प्रमाणावर ती संताप असल्याचा दावा करत ते म्हणाले की, आपला फौज फाटा घेऊन नाशिकला येतात भेट देतात पण प्रत्यक्षात मात्र काम होत नाही असे सांगून राऊत पुढे म्हणाले की, अभिव्यक्ती स्वतंत्र्याची व्याख्या मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यायला पाहिजे त्यासाठी त्यांनी संविधान वाचले पाहिजे म्हणजे त्यांना अभिव्यक्ती म्हणजे काय हे त्यांना नक्कीच कळेल अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे आधीचे नेते तुरुंगात गेले होते याचा विसर त्यांना पडला असेल, असे त्यांनी सांगितले.