सिंधुदुर्ग – शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरुपी सेवेत समाविष्ट करून घेणे या मागणीसाठी उमेद अभियानातील कर्मचारी, केडर यांनी आजपासून काम बंद आंदोलनाला सुरु केले आहे.
यापूर्वी आझाद मैदान वर धरणे आंदोलन, सर्व मंत्री महोदयांना निवेदने, पालकमंत्र्यांना निवेदन, असहकार आंदोलन अशाप्रकारची आंदोलन करण्यात आले होती. परंतु त्याला योग्य प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी काम बंद आंदोलनाचे पाऊल संघटनेने उचलले आहे. या सर्वाचा विचार करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांनी उमेद अभियानाची स्वतंत्र आस्थापना तयार करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.