मुंबई : जगप्रसिद्ध बॉक्सिंग खेळाडू जॉर्ज फ्रीमन यांचे 76 वर्षीय निधन झाले आहे.त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावरून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जॉर्ज फ्रीमन हे दोनवेळा हेवीवेट चॅम्पियन झाले होते. सर्वात पहिल्यांदा १९६८ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचे सुवर्णपदक जिकल्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यानंतर दोन वेळा त्यांनी हेवीवेट बॉक्सिंग चॅम्पियनशीपचे विजेतेपद मिळवले होते. फ्रीमन यांच्या कारकिर्दीत १९७ मध्ये जगप्रसिद्ध बॉक्सिंगपटू मुहम्मद अली यांच्याबरोबरचा सामना विशेष संस्मरणीय राहिला होता. झायरामधीलरम्बल इन दजंगल स्पर्धेत अली यांच्याबरोबरच्या सामन्यात फ्रीमन यांनी आठव्या फेरीपर्यंत मजल मारली होती. अखेर त्यांना नॉकआऊट व्हावे लागले होते. हा सामना इतका गाजला होता, की त्यावर व्हेन वुई वेअर किंग्ज नावाचा माहितीपट काढण्यात आला आणि या माहितीपटाला ऑस्कर पुरस्कार देखील मिळाला.
मुहम्मद अली यांच्याकडून पराभूत झाल्यानंतरही फ्रीमन यांनी व्यवसायिक बॉक्सिंगपटू म्हणून करिअर पुढे सुरू ठेवले. त्यांनी जो फ्रेझर, आणि रॉन लायेल यांच्यासारख्या महान बॉक्सिंग खेळाडूंना पराभूत केले. दशकभरानंतर वयाच्या ३८ व्या वर्षी पुन्हा हेवीवेट बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये भाग घेऊन इव्हांडर होलिफिल्ड या युवा खेळाडूला जोरदार टक्कर दिली होती. वयाच्या ४५ व्या वर्षी मायकल मूरर याला खेळाडूला दोनच ठोशात पराभूत करून त्यांनी पुन्हा हेवीवेट चॅम्पियनशीप जिंकली होती. हेवीवेट चॅम्पियन राहिलेले ते सर्वात वयस्कर खेळाडू ठरले होते. निवृत्तीनंतर त्यांनी क्रीडा वाहिनीवर बॉक्सिंगचे विश्लेषक म्हणून काम केले.