केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यात निपाह व्हायरसच्या प्रादुर्भावाने तरुणाचा मृत्यू

0

नवी दिल्ली – केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील एका 24 वर्षीय तरुणाचा निपाह व्हायरसच्या संसर्गामुळे मृत्यू झाला, त्यानंतर राज्य सरकारने तातडीने अलर्ट जारी केला आहे. केरळ सरकारने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे (आयसीएमआर) मदत मागितली आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी आज, मंगळवारी सांगितले की, मलप्पुरममधील एका विद्यार्थ्याचा निपाह व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. या व्यक्तीच्या 175 संपर्कांपैकी 26 उच्च-जोखीम श्रेणीतील आहेत. 26 पैकी 13 जणांच्या घरावर पाळत ठेवण्यात आली आहे. संक्रमित आढळलेल्यांसाठी वेगळी ठिकाणे आहेत याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्व उपाययोजना केल्या आहेत. आम्ही मदतीसाठी आयसीएमआरकडे विनंती केली आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक महत्त्वाची पावले उचलली असून स्थानिक भागांना कंटेनमेंट झोन घोषित केले आहेत. नागरिकांना मास्क घालून गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच शाळा, महाविद्यालये, शिकवणी केंद्रे, मदरसे, अंगणवाड्या आणि सिनेमा हॉल बंद करण्यात आले आल्याचे जॉर्ज यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech