लाटांचा जोर वाढल्याने जंजिरा वेळेआधीच पर्यटकांसाठी बंद

0

मुरूड जंजिरा – मुरुडच्या समुद्रात लाटांचा जोर वाढल्याने मुरुडचा निर्धारित वेळेआधीच जंजिरा जलदुर्ग शुक्रवारी काल सकाळी ११ वाजल्या पासूनपर्यटकांना पाहण्यासाठी कुलूपबंद करण्यात आल्याने राज्यातून आलेल्या अनेक पर्यटकांची घोर निराशा झाली. जंजिरा बंद करण्यात आल्याचे समजताच मुरूड, रोहा, दिघी,श्रीवर्धन, पुणे,अलिबाग,मुंबई कडून आलेली पर्यटकांची सुमारे 600 वाहने माघारी वळविण्यात आली.

शासकीय आदेशाप्रमाणे 26 मेपासून जंजिर्याचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार होते.मात्र गुरुवार पासून वादळी वातावरणामुळे समुद्रात लाटा उसळू लागल्याने पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मेरिटाइम बोर्डाचे खोरा बंदर निरीक्षक प्रमोद राऊळ आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली.आज दुपारी खोरा बंदर जेट्टीवर भेट दिली असता असंख्य पर्यटक सकाळपासून जंजिरा पाहण्यासाठी दाखल झाल्याचे स्टॉल धारकांनी सांगितले.परंतु पर्यटकांना समुद्रात जंजिऱ्यावर उसळणाऱ्या लाटांचे तांडव पाहून परतावे लागले.

२३ मे पासूनच समुद्रात हळूहळू वादळी वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली होती.या घडामोडी कदाचित शांत होतील अशी फोल ठरल्याचे राजपुरी बंदर जेट्टीवर सांगण्यात आले.समुद्रात लाटांचा उसळण्याचा वेग वाढला असल्याचे खोरा बंदर जेट्टीवरून शनिवारी दुपारी दिसून आले.जंजिरा जलदुर्गाजवळील प्रवेशद्वारावर पर्यटकांना उतरणे धोकादायक बनल्याने केवळ शिडाच्या बोटी आणि मोटर लाँच मधून पर्यटकांना जंजिरा बाहेरून दाखविण्यात आला.खोरा जेट्टीवर मुरूड पर्यटन जलवाहतूक सहकारी संस्थेच्या चार लॉन्च असल्याचे संस्थेचे खोरा येथील लिपिक बबन सतवीडकरयांनी दिली.पुणे,मुंबई,कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्राच्या विविध भागातून पर्यटक जलदुर्ग बंद असल्याची माहिती नसल्याने येतच होते.गुरुवारपासूनच समुद्रात लाटा उसळत असल्याची माहिती एकदरा कोळी समाज अध्यक्ष, मुरूड मच्छीमार कृती समिती अध्यक्ष तथा हनुमान मच्चीमार सहकारी संस्थेचे चेअरमन पांडुरंग आगरकर यांनी दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech