रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी रोपवे द्वारे हवाई बस वाहतूक..परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी अभिनव संकल्पना

0

मुंबई, २४ : महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित परिवहन मंत्री म्हणून . प्रताप सरनाईक यांनी मंत्रालय येथील दालनात पदभार स्वीकारला.   मुंबई ठाणे रायगड पालघर या जिल्ह्यातील रस्ते वाहतुकीवर पडणारा प्रचंड ताण लक्षात घेऊन येत्या भविष्यकाळात एम एम आर क्षेत्रामध्ये हवाई बस वाहतूक सुरू करण्याचा मानस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केला आहे. त्यांच्या स्वागतासाठी विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

पदभार स्वीकारल्यानंतर श्री. सरनाईक यांनी वयोवृद्ध  आणि महिलांना ५० टक्के सवलत  याप्रमाणे अनेक हितकारक निर्णय घेतले जातील. राज्यातील जनतेला अधिक चांगल्या आणि सोयीस्कर परिवहन सेवा देण्यासाठी प्रधान्याने प्रयत्न करणार आहे. राज्य परिवहन मंत्री मंडळाचे उत्पन्न वाढवणे व एसटी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे याकडे प्रामुख्याने भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एसटी महामंडळात सुसूत्रता आणायची आहे. एसटी ही तळागळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागले तर मी नक्की तशी भूमिका घेणार असल्याचे असे त्यांनी स्पष्ट केले.

रस्ते वाहतूक बरोबर हवेतील वाहतुकीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. बँगलोर रोप वे वाहतूक सुरु करण्यात आली आहे. १५ ते १६ सीटच्या बसेस रोपवे द्वारे एमएमआर क्षेत्रात सुरु केल्यास रस्तावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. या दृष्टीने आपल्या येथे वाहतूक व्यवस्था करता येईल का या दृष्टीने माझा प्रयत्न असेल असे प्रताप सरनाईक म्हणाले. बँगलोरच्या रोप वे वाहतुकीचे निरीक्षण करून त्यांचा अहवाल तयार करण्यात येईल. त्यावर प्रोजेक्ट रिपोर्ट परिवहन विभाग तयार करेल. तो दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरीना सादर करण्यात येईल अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

गुजरातमधील बस डेपो अत्याधुनिक आहेत. तसेच कर्नाटकची प्रवासी वाहतूक अत्यंत सुसज्ज आहे. या दोघांचीही पाहणी करण्यात येईल. ज्या इतर राज्यात चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या राज्यात कशा राबवण्यात येतील या दृष्टीने परिवहन विभाग कार्य करेल.

हवेतील प्रवासी वाहतूक आपण जर चालू केली तर देशातील महाराष्ट्र राज्य हे एक नंबरचे ठरेल. नफा कमवणारी परिवहन सेवा म्हणून आपल्या राज्याची नवी ओळख निर्माण होईल. हे माझे व्हिजन असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. टप्पा टप्प्याने या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करण्यात येईल. राज्याच्या परिवहन विभागाला अत्याधुनिक, सुसज्ज अशी दिशा देण्यात येईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech