एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

0

मुंबई : राज्य विधानसभेची आज मंगळवारी मुदत संपत असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. शिंदे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना आपला राजीनामा सादर केला. त्याचवेळी नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत राज्यपाल शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्य कारभार पाहतील. भाजप नेते राहुल नार्वेकर म्हणाले की, नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्य कारभार पाहण्याची विनंती केली जाईल. तिन्ही पक्षाचे नेते, आमचे संसदीय मंडळ मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील आणि लवकरच महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल असे नार्वेकर यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मुंबई दौरा प्रस्तावित आहे. तिन्ही पक्षांच्या बैठकीनंतर आज, मंगळवारी सायंकाळपर्यंत नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित होऊ शकते. शिवसेनेचे नेते मुंख्यमंत्रीपदासाठी अडून बसले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची फोनवर चर्चा झाली आहे. परंतु, आता मुंबईतच यासंदर्भातील अंतिम निर्णय अपेक्षित आहे.अमित शहा मुंबईत येत असल्याने शिंदे यांनी आपल्या सर्व भेटी व कार्यक्रम रद्द केले आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांनी दिल्लीला जाणेही टाळले आहे. दरम्यान, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभाला उपस्थित राहून उपमुख्यमंत्री फडणवीस हे अमित शहा यांच्याशी चर्चा न करताच मुंबईला परतले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech