रत्नागिरीतील गोळवलीत गोळवलकर गुरुजींचे सुसज्ज स्मृती केंद्र : भैय्याजी जोशी

0

रत्नागिरी – जागतिक पातळीवर परमपूज्य गोळवलकर गुरुजींनी गोळवलीसह देशाचा आणि स्वतःचा नावलौकिक केला आहे. गोळवली गावात होत असलेल्या सुसज्ज अशा गोळवलकर गुरुजींच्या स्मृती केंद्राला प्रत्येकजण भेट देतील. त्यामुळे गोळवलकर गुरुजींच्या स्मृतीला कायमस्वरूपी उजाळा मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेश तथा भैय्याजी जोशी यांनी केले.

संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथील गोळवलकर गुरुजी स्मृती केंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, गावामुळे जशी व्यक्ती मोठी होते, तसेच व्यक्तीच्या कर्तृत्वामुळे गाव मोठे होते. आपली अफाट बुद्धिमत्ता, अविस्मरणीय कर्तृत्व, निःस्वार्थी जनसेवा करून संपूर्ण जगात परमपूज्य गोळवलकर गुरुजींनी गावाचे त्याचप्रमाणे देशाचे आणि आपले नाव वाढविले. यापुढे गोळवलीत सुसज्ज होणाऱ्या त्यांच्या स्मृती केंद्रास भेट देणारे गुरुजींच्या स्मृतीस कायमस्वरूपी उजाळा देण्याचे काम करतील. यासाठी ग्रामविकास प्रकल्पाच्या पंचक्रोशीतील सर्वांचे खूप मोठे सहकार्य मिळत आहे. या प्रकल्पाचे व्यवस्थापक देशपांडे उभयतांनी आपल्या कार्यकौशल्याने खूप मोठा जनसंपर्क वाढवल्यामुळे ग्रामविकास होत आहे.

भूमिपूजन झालेल्या स्मृती केंद्राच्या इमारतीची माहिती प्रोजेक्टरवरून उपस्थितांना देण्यात आली. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अॅड. प्रशांत पाध्ये यांनी केले. प्रकल्पाचे व्यवस्थापक शेखर देशपांडे यांनी मागील १७ वर्षे प्रकल्पावर काम करताना मिळालेले सहकार्य, राबवलेले उपक्रम याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला गोळवलीच्या सरपंच शालिनी पतये, गावकर दत्ताराम दुदम, दत्ताराम सोलकर, संतोष पावरी, अॅड. प्रशांत पाध्ये, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech