नांदेड – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये रविवारी महिला सशक्तीकरणची जनसभा पार पडली. या कार्यक्रमात जिल्ह्यातील हजारो महिलांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी सकाळपासूनच महिलांची मोठी गर्दी झाली होती. परंतु, 53 वर्षांच्या एका महिलेला हृदय विकाराचा झटका आला आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शांताबाई मोरे असं मृत पावलेल्या महिलेचं नाव आहे. त्या भंनगी येथील रहिवासी होत्या. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून नवीन मोंढा मैदानात कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. हा कार्यक्रम दुपारी 2.30 वाजता सुरु होणार होता. पण सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम सुरु झाला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील हजारो महिलांनी सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमात जिल्ह्यातील लाभार्थ्यांशिवाय, मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, मुख्यमंत्री नि:शुल्क उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थ्यांना आमंत्रित केलं होतं.
मुख्यमंत्री बळीराज वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे लाभार्थीही मोठ्या संख्येत उपस्थित होते. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण मिशन कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून 249 बसची व्यवस्था करण्यात आली होती. शांताबाई मोरे यांच्यासह भंनगी गावतील 22 महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी कांताबाईला चक्कर आली आणि त्या खाली पडल्या.
त्यानंतर शांताबाईला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण दुर्देवाने शांताबाईंचा उपचारादम्यान मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्याने शांताबाईचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. महिला सकाळपासूनच या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. कार्यक्रमस्थळी उष्णता होती. तसच अन्न-पाण्याचीही व्यवस्था नव्हीत, असा आरोप लोकांनी केला आहे. या घटनेनंतर गावातील सरपंच आणि ग्रामस्थांनी आर्थिक सहाय्यतेची मागणी केली आहे.