सुनील सुरवसे ( बीड)
____________________
मागच्या आठवड्यात (आचारसंहितेपूर्वी) मराठवाड्यात डॉ. खासदार श्रीकांत शिंदे यांचा दौरा झाला होता. त्या दिवशी सकाळी जालन्यातील वरिष्ठ शिवसेना नेते अर्जुन खोतकर इथे बैठका व मेळावा करून दुपारी हेलिकॉप्टरने येऊन त्यांनी बीड मध्ये जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक यांच्याकडे मेळावा घेतला होता. आता त्या दिवशीच्या नियोजित कार्यक्रमानुसार त्याच्या पुढचा मेळावा होता परभणीत सायंकाळ ४ चा..! बीडचा मेळावा संपवून ४.३० च्या आसपास सगळे परभणी साठी निघाले होते ; परंतु परभणीत पाऊस सुरू असल्याने वातावरण धुरकट होते. *हवाई रस्त्याने पोहचणे अशक्य..! By Road जायचे तर जवळपास साडे तीन तासांचा प्रवास..!* शेवटी संध्याकाळच्या वेळेला पायलटने रिस्क न घेता अर्ध्या रस्त्यातून चॉपर वळवले ते पुन्हा बीड साठी..!
*पुन्हा ते बीडला उतरले ; इथून परभणी रस्त्यांने पोहचणे म्हणजे रात्रीचे १० होणार..!* तरीही परभणीच्या महिलांचा, कार्यकर्त्यांचा प्रचंड आग्रह.. आयोजक अप्पाराव वावरे, निरीक्षक सुभाष साळुंखे, माजी खा. जाधव, अमित गीते, देशमुख, पोंढे तसेच जिल्हाप्रमुख शिंदे _ कदम, संपर्क प्रमुख यांच्यासह सर्वच पदाधिकारी आलेच पाहिजेत म्हणून आग्रही..!
*शेवटी ठरले जायचे..!* बीड परभणी नंतर अजून एक शेवटचा कार्यक्रम होता.. रात्री ७ चा पाथरीचा सईद खान यांचा..! पण आता प्रवास by road असल्याने रस्त्यातील कार्यक्रम उरकावून जाणे अधिक सोयीचे.. म्हणून पाथरीचा कार्यक्रम संपवून डॉक्टर साहेब परभणी पोहचले.
जवळपास रात्रीचे १० झालेले असावेत. दुपारच्या कार्यक्रमासाठी गच्च भरलेल्या (जवळपास १५/२० हजार कार्यकर्ते) सभामंडपात धो धो पाऊस, त्यामुळे मैदानात झालेला चिखल, सभेसाठी उलटून गेलेले ६ तास; तरीही ३०००-४००० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांना नमन करून डॉ श्रीकांत शिंदे साहेबांनी घरगुती संवाद साधला.. सेल्फी झाल्या.. हार- तुरे सत्कार झाले. शाली तसेच फुलांचा वर्षाव होत होता. शेतकरी वीज बिलासाठी आभार मानत होते. लाडक्या बहिणींनी राख्यांनी हात भरवला होता. युवा कार्यकर्ते घोषणा देत होते. “माहोल” होता..
*त्यात एक महिला भगिनी पुढे आल्या.* थोडेसे काळपटलेले झेरॉक्सचे काही कागद हातात .. कागद पुढे करत त्या म्हणाल्या “ह्या रस्त्याने माझ्या मुलांचा अपघात केलाय..मला रस्ता द्या साहेब..” तुम्ही येणार आहात आणि तुम्हीच न्याय द्याल म्हणून थांबले सकाळपासून आतापर्यंत..!” मला रस्ता द्या साहेब”
साहेबांनी झेरॉक्स पहिले.. पदाधिकाऱ्यांना बोलावले.. लगेच आदेश ही दिला. मा. खा. सुरेश जाधव, आपले पदाधिकारी, आयुक्त / मनपा प्रशासन यांनी उद्याच पाहणी करून मागणी पाठवायची. रस्ता लगेच देतो.! *“साहेबांनी शब्द दिला म्हणजे दिला”!*
आयुक्तांकडून पाहणी झाली..! मागणी आली..! १ दिवसात रस्त्याचा निधी मंजूर झाला.! ( आचार संहितेपूर्वी)…! आता आचार संहितेनंतर कामही सुरू होईल..!
*पण हे महत्त्वाचे की एका आईला दिलेल्या शब्दाचे सोने केले खा डॉ श्रीकांत शिंदे साहेबांनी..!*
On the Spot..!
म्हणून तर म्हणतात “ बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले..!”
अभिमान आहात तुम्ही तरुणांचा..! आम्हा कार्यकर्त्यांचा…!
___________________________