१ डिसेंबर रोजी ३८वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन

0

पुणे – आपणास विधीत असेलच की भारताच्या मॅरेथॉनची जननी असलेली पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यंदा ३८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यंदाची३८वी मॅरेथॉन रविवार १ डिसेंबर रोजी पहाटे ३:०० वाजता सुरू होईल. सणस मैदान येथील हॉटेल कल्पना व विश्व चौकातून या ४२.१९५ किलोमीटरच्या पुरुष व महिला मॅरेथॉनला पहाटे ३:००वा. झेंडा दाखवून सुरुवात करण्यात येईल. तसेच ३: ३० वाजता पुरुष महिला (२१.०९७५)अर्ध मॅरेथॉन, १० कि.मी.सकाळी ६:३० ला.५ कि.मी..सकाळी ७:०० व ७:१५ मिनिटांनी व्हील चेअर ३कि.मी या स्पर्धेना या वेळेनुसार सुरुवात होईल.

पुरुष व महिला मॅरेथॉन सणस मैदानासमोरील हॉटेल कल्पना विश्व चौक येथून कै. बाबुराव सणस पुतळ्या पासून उजवीकडे वळून सारसबाग चौपाटी, महालक्ष्मी मंदिर चौकातून उजवीकडे वळून सावरकर पुतळ्या समोरून, खंडोबा मंदिराहून दांडेकर चौक तेथून सरळ सिंहगड मार्गे , गणेश मळा, राजाराम पूल संतोष हॉल, गोयल गंगा चौक, धायरी पुलावरून, नांदेड सिटीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाऊन डिस्टेंशन सेंटर येते सर्कलला गोल वळसा घेऊन परत त्याच मार्गे सणस मैदान येथे परत येईल, तेव्हा(२१.०९७५) किलोमीटरचा टप्पा पूर्ण होईल. पुन्हा त्याच मार्गेने दुसरी फेरी पूर्ण करून सणस मैदान येथे (४२.१९५ )की.टप्पा पार करतील. तसेच पुरुष व महिला अर्ध मॅरेथॉन त्याच मार्गे एक फेरी पूर्ण करून २१ किलोमीटरचा टप्पा पार करतील. याशिवाय १० किलोमीटर ही याच मार्गाहून सिंहगड रोडवरील संतोष हॉल समोरून वळसा घालून परत सणस मैदान येथे पूर्ण होईल.५ किलोमीटर ही त्याच मार्गे गणेश मळा चौकातून वळसा घालून परत सणस मैदान येथे पूर्ण होईल. तसेच पुरुष व महिला व्हीलचेअर ३ किलोमीटर ही दांडेकर पूल चौकातून वळसा घेऊन परत त्याच मार्गे सणस मैदान येथे समाप्त करतील.

या मॅरेथॉन मध्ये १२००० हून अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतील अशी अपेक्षा आहे .यांच्या प्रवेशाची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंतwww.Marathon Pune.com येथे प्रवेश अर्ज भरता येऊ शकेल. या स्पर्धेतील विजेत्यांना पुणे महानगरपालिकेतर्फे ३५लाख रुपयांची बक्षिसे दिली जातील. पुरुष व महिला मॅरेथॉन ,व अर्ध मॅरेथॉन गटातील पहिल्या ३ भारतीय क्रमांकांच्या स्पर्धकांना विशेष पारितोषिके देण्यात येतील. यंदा इथोपिया, केनिया टाझानिया, मोरीसिस इत्यादी देशातून आत्तापर्यंत६० हून अधिक स्पर्धकांनी नाव नोंदणी केली आहे. याशिवाय सेनादल, रेल्वे, पोलीस, आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (ASI) बॉम्बे सपर्स, एसआरपीएफ, एनडीए,यांच्याही प्रवेशिका येत आहेत. त्याच बरोबर लडाख – कारगिल संघ ही सहभागी झाला आहे.

या मार्गाची मोजणी “एम्स” या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या प्रतिनिधी तर्फे शास्त्रीय पद्धतीने करण्यात आली असून ठीक ठिकाणी पोलीस बंदोबस्त, पुण्यातील गणेश मंडळे आगाशे कॉलेज सरहद कॉलेज व पुण्यातील इतर कॉलेज व अनेक क्रीडा संस्था, क्लब चे स्वयंसेवक.,उत्तम प्रकाश योजना, डॉक्टर व नर्सेस यांची पथके, ॲम्बुलन्स सेवा मार्गावर पाणी,एनर्जी ड्रिंक प्रसाधनगृहे,ची व्यवस्था आधीची पूर्वतयारी सुरू झाली आहे . डॉक्टर पथकाचे नेतृत्व डॉक्टर राजेंद्र जगताप करत आहेत. यांच्याबरोबर संचेती हॉस्पिटल, नवले हॉस्पिटल ,भारती विद्यापीठ, सिम्बॉयसिस, एमआयटी, अशा संस्थेची डॉक्टर व नर्सेसची पथके सहभागी होत आहेत यावर्षी पुणे मॅरेथॉन ची Run For Environmental sustainability ह्या थीमला अनुसरून संस्थेतर्फे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून ऑगस्ट महिन्यात वृक्षारोपण मोहीम राबवली गेली. या वेळी मॅरेथॉन मार्गावरती जमा होणाऱ्या पाण्याच्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांचे रिसायकलिंग केले जाणार आहे. कार्बन फ्रुट प्रिंट कमी करण्यासाठी देखील विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

यावर्षी पहिल्यांदाच विजेत्यांना देण्यात येणारे गौरव पदक पर्यावरण पूरक बांबूंची असतील. या सोबतच मॅरेथॉन ची माहिती व तयारी या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा marathon mind-set कार्यक्रम दर आठवड्याला Pune international marathon च्या यूट्यूब वरून प्रसारित केला जाणार आहे. पुणेकर क्रीडाप्रेमी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मॅरेथॉनला मोठा प्रतिसाद देतील असा विश्वास आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech