अहमदनगर – महात्मा फुले कृषि विद्यापीठाला मानाचा समजला जाणारा नवी दिल्ली स्थित भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाचा (फिक्की) या वर्षाचा सर्वोकृष्ट विद्यापीठ-२०२४ या पुरस्काराने सन्मानीत कर ण्यात आले.हा पुरस्कार भारत सरकारचे ब्रिटीश उच्चायुक्त श्रीमती लिंडी कॅमेरॉन यांच्या शुभहस्ते देण्यात आला.विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.पी.जी. पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.नवी दिल्ली येथे १० वी उच्च शिक्षण शिखर परिषद-२०२४ संपन्न झाली.या परिषदेमध्ये भारत सरकारचे ब्रिटीश उच्चायुक्त श्रीमती लिंडी कॅमेरॉन,भारत सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालयाचे अपर सचिव एस.के.बार्नवाल,विस्तार शिक्षण संचालक डॉ.गोरक्ष ससाणे,संशोधन संचालक डॉ.विठ्ठल शिर्के,देशातून आलेले औद्यो गीक क्षेत्रातील तज्ञ,शिक्षण क्षेत्रातील तज्ञ उपस्थित होते.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कार्यक्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात विस्तारलेले आहे.कृषि विद्यापीठ हे पदवीपासुन ते पदव्युत्तर पदवीपर्यंत तसेच आचार्य पदवीचे शिक्षण देते.आत्तापर्यंत कृषि विद्यापीठातून १,५६,३३३ विद्यार्थ्यांनी पदव्या प्राप्त केल्या आहे.कृषि विद्यापीठाने आत्तापर्यंत अन्नधान्य,फळे,फुले,चारा पिके यांचे ३०६ हुन अधिक वाण विकसीत केले असून मृद व जलसंधारण,पीक लागवड पध्दती,खते आणि पाणी व्यवस्था पन,रोग व किडीचे नियंत्रण,अवजारे,हरितगृहा तील शेती,प्रक्रीया,दुग्धशास्त्र या विषयी सखोल संशोधन करुन १८६६ हुन अधिक महत्वपूर्ण शिफारशी,५१ सुधारीत कृषि अवजारे आणि ४ पेटंट प्रसारीत केले आहेत.विस्तार शिक्षण कार्यातही विद्यापीठाचे महत्वपूर्ण योगदान आहे.महात्मा फुले कृषि विद्यापीठाने शिक्षण,संशोधन व विस्तारामध्ये केलेले अभुतपूर्व कार्य यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.हा पुरस्कार मिळविणारे महात्मा फुले कृषि विद्या पीठ हे महाराष्ट्रातील हे एकमेव विद्यापीठ आहे.