भंडारा : महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन ठरलेला आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. आज महाराष्ट्र मध्ये ज्या पद्धतीने फुले , शाहू , आंबेडकरी विचारायला संपवण्याचा पाप भाजप प्रणेती एकनाथ शिंदे सरकार करत आहे. त्याच्या विरोधात लोकांमध्ये रोष आहे. शेतकरी ,शेतमजूर , महिला त्रस्त आहेत. महागाई खूप वाढलेली आहे. सरकार जाणून-बुजून या प्रश्नात दाबून महाराष्ट्र विकण्याचं काम करत आहे. या अत्याचार्य व्यवस्थेबद्दलचा हा संखणाद आम्ही पुकारलेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा समर्थन महाविकास आघाडीला मिळणार आहे.रामटेक मतदार संघातून काँग्रेस मधून बंडखोरी करत राजेंद्र मूळक हे बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावर नाना पटोले बोलले की सर्वच पक्षामध्ये बंडखोरी होत असते त्यामुळे चार तारखेपर्यंत आम्ही सगळे बंडखोरी थांबवण्याचा प्रयत्न करू असे पटोले यांनी सांगितले.