नागपुर : कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याच्या एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने
निकाल देताना नागपूरच्या ड्रीम एशिया थीम पार्क अँड रिसॉर्टच्या संचालकांवर मनाई आदेश जारी केला आहे. आपल्या निर्णयात न्यायालयाने संबंधित कंपनीवर ठपका ठेवत ठरवले असून कंपनीने ध्वनी किंवा संगीत परवानगीशिवाय भविष्यात वापरू नये, असे आदेश दिले आहेत. कंपनीचे संगीत वापरण्यासाठी कंपनीची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
कुठल्याही इव्हेंट आयोजक आणि किंवा आयोजन स्थळी कॉपीराइट सामग्री वापरण्यापूर्वी योग्य परवाने किंवा रीतसर परवानगी घेणे आवश्यक असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. यासोबतच भविष्यात कोणत्याही कार्यक्रमात संबंधित कंपनीच्या संगीताचा वापर न करण्याची न्यायालयाने बजावले आहे.