अकोला : राज्यात विधानसभा निवडणुका घोषित झालेल्या असून सर्वच राजकीय पक्ष आपल्या सोबत असलेल्या राजकीय पक्षांना जागा वाटपाच्या वाटाघाटी करीत असतानाच महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी आपली स्वतःची उमेदवारी घोषित करून अर्ज दाखल करण्याची तारीख ही पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आपल्या विविध वादग्रस्त वक्तव्य सर्व परिचित आहेत अशातच त्यांनी आता आणखीन एक वक्तव्य केले आहे. महायुती मधील जागांचा तीडा अजून सुटलेला नसताना या आमदार महोदयांनी आपली उमेदवारी स्वतःच घोषित करून टाकली. यासाठी त्यांनी विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. एवढ्यावरच न थांबता गायकवाड यांनी आपण 28 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले.
महायुती सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विकासकामे झालेत त्याबाबत आज आ.संजय गायकवाड यांनी जनसंपर्क कार्यालयातील पत्रकार परिषदेव्दारे माहिती दिली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारमध्ये महाराष्ट्रात मोठयाप्रमाणात विकासाची कामे झाली. त्याचप्रमाणे प्रत्येक घटकांसाठी महामंडळाची निर्मिती करून त्यांना सक्षम करण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहे.
महायुती सरकारमध्ये सर्वात लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे असंख्य महिला आज त्या योजनेचा लाभ घेत आहे.. तसेच महिलांच्या नावार गॅस असल्यास त्या महिलांना तीन गॅस मोफत दिले जात आहे..लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका अजोबा आजी अशा विविध योजना सरकारच्या माध्यमातून राबिवल्या गेल्या.. याचा मोठया प्रमाणात लाभ राज्यातील जनता घेत आहे.. बांधकाम कामगारांसाठी सुध्दा विविध योजना सरकार राबवित आहे.. तसेच महायुती सरकारच्या काळात अनेकांना विविध योजनांच्या माध्यामातून घरे मिळाली.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मोठ्याप्रमाणात विकासाचे कामे झालीत, काही प्रगतीपथावर आहेत.. बुलढाणा शहरात विविध महापुरूषांचे स्मारके उभारण्यात आली..शहरातील विद्युत रोषणाईने शहरला सौंदर्य प्राप्त झाले आहे..अनेक रस्त्याची कामे करण्यात आली..त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय कृषी महाविद्यालय सुध्दा सुरू झाले आहे.. अशाचप्रकारे बुलढाण्याच्या विकासाला पुढे घेऊन जाण्यासाठी जनतेने महायुतीला साथ द्यावी अशी अशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.