शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम गाव शिरोळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास शासनाची मान्यता

0

 

(प्रफुल्ल शेवाळे)

शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेलं शिरोळ गाव येथील प्रबुद्ध ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री.राजेश घनघाव, यांनी बारा वर्षांपासून सुरू केलेल्या पाठपुराव्याला यश.

शहापूर तालुक्यातील शिरोळ ग्रामपंचायत आणि अजनुप ग्रामपंचायत हद्दीत नव्वद टक्के आदिवासी तर दहा टक्के बिगर आदिवासी समाज आहे. या परिसरात सुरुवातीस शासनाचे कुठलेच आरोग्य केंद्र नव्हते, मागील काही वर्षांपासून शिरोळ व अजनुप येथे आरोग्य उपकेंद्र सुरू झाली आहेत. या परिसरातील नागरिकांना उपजीविकेचे कुठलेच साधन नाही, जंगलातील पाला पाचोळा आणि लाकडे विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. घरातील कोणी आजारी पडल्यास पैष्या अभवी प्रथम गावठी उपचार, जर जास्तच तब्येत बिघडली की मग गावातली दुकानदारांकडून उसने किंवा व्याजाने पैसे घेऊन उपचारासाठी कसारा, खर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागत होते.
उपचार न मिळाल्यामुळे हया परिसरातील नागरिकांना जीवाला मुकावे लागले आहे.

अशी गंभीर परिस्थिती पाहता राजेश घनघाव यांनी सर्व गोष्टींचा सातत्याने अभ्यास करून सर्व प्रथम तत्कालीन खासदार श्री सुरेश टावरे यांचेकडे हि परिस्थिती कथन केली, त्यांनी तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी, ठाणे यांना पत्र दिले, तिथपासून खरी सुरूवात झाली. यानंतर शिरोळ ग्रामपंचायतीचा ठराव संमत करून घेण्यात आला , त्यानंतर शहापूर पंचायत समितीच्या सभापती सौ. मंजुषा जाधव यांच्याकडे पाठपुरावा करून पंचायत समितीचां ठराव पास करून घेतला गेला .

सदरचा प्रस्ताव पुढे जिल्हा परिषदेकडे गेला, तिथे हि शिरोळ येथे विशेष बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे , यासाठी ठराव संमत करण्यात आला. तद्नंतर सदरचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेसाठी सादर केला, तिथे त्या समितीमध्ये असणाऱ्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून सदरचा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत विनंती केली गेली.या साठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. मंजुषा जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच आरोग्य भवन, मुंबई येथून सदरचा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयातील येथील सह सचिव सौ. अर्चना वालझडे यांनी हि मोलाचे सहकार्य केले. शहापूर तालुक्याचे आमदार श्री दौलत दरोडा आणि अंबरनाथ विधानसभेचे आमदार श्री बालाजी किणीकर यांची या कामी शिफारस पत्राची साथ लाभली.

शासनाकडे सदरचा प्रस्ताव अनेक काळ प्रलंबित होता तो मार्गी लावण्यासाठी,मुख्यमंत्री कार्यालयाचे उप सचिव श्री चंद्रशेखर तरंगे यांनी शासन निर्णयासाठी मोलाचे सहकार्य केले, आणि सदर आरोग्य केंद्र उदयास आले असल्याची माहिती राजेश घनघाव यांनी दिली आहे. सदर कामासाठी पंचक्रोशीतील नागरिकांकडून राजेश घनघाव यांच्या पाठीवर कौतुकाची थाप निश्चित पणे पडत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech