रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल आणि आशीर्वाद फाउंडेशन आयोजित दिव्यांग मुलांसाठी चित्रकला स्पर्धा

0

ठाणे – रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल आणि आशीर्वाद फाउंडेशन, ठाणे यांनी संयुक्तपणे आषाढी एकादशी निमित्ताने दिव्यांग मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.
‘रंगू वारी संगे’ या विषयावर ही स्पर्धा १० ते १२, १३ ते १६ आणि १६ ते १८ अशा तीन वयोगटांत घेण्यात आली.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी पल्लवी देवल, स्वाती निंबाळकर आणि आशीर्वाद फाउंडेशनच्या अश्विनी पटवर्धन यांनी विशेष परिश्रम घेतले.
कल्पना पटवा, अथर्व गायकवाड आणि विनीत सुवर्णा यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेस रोटरी अध्यक्ष स्वाती येरी, चिटणीस कलाश्री, शीतल थोरात, डॉ. माधवी डोळे आणि अन्य रोटरी सदस्य उपस्थित होते.
सर्व स्पर्धकांना सहभागानिमित्त प्रमाणपत्रेही देण्यात आली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech