कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज, मंगळवारी कायदा मंत्री मोलॉय घटक यांनी बलात्कार विरोधी विधेयक मांडले ते सभागृहाने मंजूर केले आहे. त्याला अपराजिता महिला आणि मुले विधेयक (पश्चिम बंगाल फौजदारी कायदा आणि सुधारणा) विधेयक २०२४ असे नाव देण्यात आले आहे.या विधेयकात दोषीला 10 दिवसांत फाशीची शिक्षा आणि 36 दिवसांत प्रकरणाचा तपास पूर्ण करण्याची तरतूद आहे.
विधेयक मंजूर करण्यासाठी 2 सप्टेंबरपासून दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.हे विधेयक आज,मंगळवारी विधानसभेत मंजूर होईल, असे मानले जात आहे. ममता बॅनर्जींच्या या विधेयकाला आम्ही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे भाजप नेते सुकांता मजुमदार यांनी रविवारी सांगितले होते. कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये 8-9 ऑगस्टच्या रात्री प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कारानंतर हल्या करण्यात आली होती. तेव्हापासून तेथील डॉक्टर सातत्याने आंदोलन करत आहेत. या घटनेनंतरच राज्यातील तृणमूल काँग्रेस सरकारने बलात्कार विरोधी विधेयक आणले आहे.