न्या. खन्ना बनणार नवे सरन्यायमूर्ती

0

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ न्यायमूर्ती संजीव खन्ना हे देशाचे 51 वे सरन्यायमूर्ती असतील. निवर्तमान सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी न्या. खन्ना यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. सरकारने ही शिफारस मान्य केल्यास न्या. खन्ना आगामी 10 नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारतील. न्या. खन्ना यांचा कार्यकाळ 23 मे 2025 पर्यंत म्हणजे सुमारे 6 महिने राहणार आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा जन्म 14 मे 1960 रोजी झाला. त्यांचे वडील न्यायमूर्ती देव राज खन्ना हे देखील दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले. त्यांची आई सरोज खन्ना या एलएसआर डीयूमध्ये लेक्चरर होत्या. येथूनच न्या. खन्नांचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी 1980 मध्ये दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली. यानंतर डीयूमध्ये काद्याचे शिक्षण घेतले. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर खन्ना यांनी 1983 मध्ये बार कौन्सिल ऑफ दिल्लीमध्ये वकील म्हणून काम सुरू केले. सुरुवातीला दिल्लीच्या तिसहजरी कॅम्पसमध्ये सराव सुरू केला. त्यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात विविध क्षेत्रांतील न्यायाधिकरणांमध्ये सराव केला. त्यांची 2005 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 2006 मध्ये स्थायी न्यायाधीश करण्यात आले. त्यानंतर 2006 ते 2019 या कालावधीत उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केल्यानंतर 18 जानेवारी 2019 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech