करणी सेनेच्या राज शेखावतचीच सुपारी निघाली

0

शेखावतने लॉरेन्स बिश्नोईवर जाहीर केले होते बक्षीस

नवी दिल्ली – कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना 1,11,11,111 रुपयांचे बक्षीस जाहीर करणारे क्षत्रिय करणी सेनेचे प्रमुख राज शेखावत यांच्या जीवाला धोक निर्माण झालाय. लॉरेन्स बिश्नोई गँगने आपली सुपारी दिल्याचा दावा शेखावत यांनी केलाय. बिहारच्या गँगला ही सुपारी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज शेखावत यांनी अलिकडेच घोषणा केली होती की, कोणताही पोलीस कर्मचारी लॉरेन्स बिश्नोई गँगचे एन्काऊंटर करत असेल तर त्यांची संघटना त्याला 1 कोटी 11लाख 11 हजार 111 रुपये देईल. तसेच, क्षत्रिय करणी सेना त्या पोलीस कर्मचाऱ्याची आणि त्याच्या कुटुंबाची पूर्ण काळजी घेईल आणि प्रत्येक गरजा पूर्ण करेल. क्षत्रिय करणी सेनेचे कोट्यवधी सदस्य आहेत. त्या लोकांनी पाच-पाच पैसे दिले तरी एक कोटी रक्कम सहज जमा होईल, असेही शेखावत यांनी म्हटले होते. युट्यूबवर दिलेल्या मुलाखतीत राज शेखावत यांनी सांगितले की, जेव्हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा विरोध केला. तेव्हा मला अनेक धमक्या आल्या.

लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य मला जीवे ठार मारण्याची धमकी देत आहे. त्या लोकांनी माझी सुपारी दिल्याची मला माहिती मिळाली आहे. बिहारमधील सिवान येथील ओसामा खान यांना दीड कोटी रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित काम झाल्यानंतर दिली जाणार आहे. ही माहिती माझ्यापर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, ही सुपारी लॉरेन्स बिश्नोईचे एन्काऊंटर करण्याचे बक्षीस जाहीर झाल्यानंतर दिली होती की, त्यापूर्वी दिली होती, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. धमक्या मिळत असल्यानंतरही मी आपल्या वक्तव्यावर कायम आहे. मला कोणतीही भीती वाटत नाही. जन्म आणि मृत्यू देणे हे ईश्वराच्या हातात आहे. ज्या व्यक्तीला मला मारण्यासाठी पाठवला होता, तो माझा समर्थक निघाला. त्याने येऊन मला ही सर्व माहिती दिली. तसेच, सुखदेव गोगामेडी यांच्या हत्येमुळे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सर्व सदस्यांचे एन्काऊंटर करण्याची आम्ही मागणी करत आहोत, असे राज शेखावत यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech