हिंदु राष्ट्राचे ध्येय साकार होण्याची वेळ जवळ आली – गोविंददेव गिरि महाराज

0

पणजी : २५ वर्षांपूर्वी हिंदु शब्दही उच्चारणे अत्यंत कठिण होते; मात्र आज हिंदु राष्ट्र येणार याची सर्वांना खात्री झाली असून ते हिंदु राष्ट्राचे ध्येय साकार होणार होण्याची वेळ जवळ आली आहे. गोविंददेव गिरि महाराज म्हणाले की, हिंदु शब्द उच्चारणे कठीण असतानाच्या काळात गोव्यात सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांनी ही संस्था स्थापन केली. यातून ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा संकल्प नुसता नाही, तर प्रवाहाच्या विरूद्ध जाऊन अनेक संकटे झेलत हिंदु राष्ट्राची जागृती संपूर्ण देशभरात केली. यामागे डॉ. जयंत आठवले यांचे तपोबल आहे. हिंदु राष्ट्र लवकरच साकार होईल, असे ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी काढले. रामराज्याचे ध्येय उराशी बाळगणार्‍या ‘सनातन संस्थे’चा रौप्य महोत्सव सोहळा शनिवारी गोव्यात संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्यात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस हे मान्यवर उपस्थित होते.

गोवा सरकार देव, देश आणि धर्म रक्षणाचे कार्यासाठी कटीबद्ध ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
सनातन संस्थेचा ‘सनातन प्रभात’ हे नियतकालिक हिंदूंवर देश आणि विदेशात होत असलेल्या अत्याचार, तसेच हिंदू करत असलेले चांगले कार्य याची निरंतर माहिती देऊन हिंदुत्वाच्या जागृतीचे कार्य करत आहे. गोविंददेव गिरी महाराज यांच्या सारख्या अनेक राष्ट्रसंतांमुळे भारतात देव, देश आणि धर्म रक्षणाचे कार्य चालत आहे, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. देवाला महत्त्व दिले, तर धर्म जागृत राहिल आणि धर्म जागृत राहिला तर देश जागृत राहिल. यासाठी गोवा सरकार देव, देश आणि धर्म रक्षणाचे कार्यासाठी कटीबद्ध आहे. सनातन संस्थेने कठीण प्रसांगांना सामोरे जाऊन आज देशभरात भरीव असे कार्य केले आहे. सनातन संस्थेचा गोव्यातील रामनाथी येथील आश्रमातून हिंदु धर्माचे रक्षणाचे महत्त्वाचे कार्य चालते.

सनातन संस्थेच्या कार्यामुळे हजारो लोक तणाव आणि व्यसनमुक्त बनले ! – श्रीपाद नाईक
गोविंददेव गिरि महाराज यांचे कार्य महर्षि वशिष्टाप्रमाणे अखंड असे धर्मरक्षणाचे कार्य केले आहे. या कार्यामुळे हजारो लोक तणावमुक्त आणि व्यसनमुक्त जीवन जगू लागले आहेत. सनातनच्या कार्यामुळे धर्म आणि अध्यात्म यांचे रक्षण झालेले आहे, असे उद्गार केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काढले. महाराजांची साधना आणि कार्य यांमुळे असंख्य जिवांच्या जीवनात चांगले पालट होऊन आज राष्ट्रभक्त निर्माण होत आहेत. सनातन संस्थेने हिंदु धर्माच्या पुनर्स्थानेचे विलक्षण असे कार्य केले आहे.

प्रखर विरोध सहन करून अग्निदिव्यातून तावून सुलाखून बाहेर पडलो – चेतन राजहंस
सनातन संस्था एक प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटना प्रसिद्ध झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालय सिद्ध करत असलेल्या ‘सी.ए.ए.’ कायद्याच्या प्रक्रियेत सनातन संस्थेचा सहभाग होता आणि यामुळे कायद्याची व्याप्ती बांगलादेशींपर्यंत पोचण्यास साहाय्य झाले. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस म्हणाले की, सनातन संस्था हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी गेल्या २५ वर्षांच्या काळात जिहादी, कम्युनिस्ट, अर्बन नक्षलवादी आदींचा प्रखर विरोध सहन करून अग्निदिव्यातून तावून सुलाखून बाहेर पडलो. वक्फ संशोधन विधेयक सिद्ध करण्याच्या प्रक्रियेतही सनातन संस्थेने उल्लेखनीय सूचना केल्या आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech