नाशिक – दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणी अखेर या प्रकरणातील मास्टरमाईंडची ओळख पटविण्यामध्ये नाशिकच्या अंबड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बडगुजर यांच्या मुलाचे नाव समोर आल्याने राजकारणामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दोन वर्षांपूर्वी 14 फेब्रुवारी 2022 रोजी रात्रीच्या सुमारास सिडको परिसरामध्ये असलेल्या गुरुकुले हॉल जवळ तीन संस्थांनी एडवोकेट प्रशांत जाधव यांच्यावरती गोळीबार केला होता.
या गोळीबार प्रकरणांमध्ये दोन वर्षानंतर पोलीस आयुक्तालयातील गुंडाविरोधी पथकाने संशयित आकाश सूर्योदय आरोपीला ताब्यात घेतले होते त्याची चौकशी केली असता मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत वाकोडे आणि सनी पगारे या दोन मध्यवर्ती कारागृहामध्ये असलेल्या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यातील आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार मयूर बेग या आरोपीचे नाव समोर आले होते. बेग याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली होती. तर मयूर बेग चौकशीमध्ये अंकुश शेवाळे आणि प्रसाद शिंदे या दोन आरोपींची नावे समोर आली या या आरोपींची चौकशी करताना या सर्व प्रकरणांमध्ये नक्की कोण आहे त्याचा शोध पोलीस घेत होते.
बेग याच्या चौकशीमध्ये पोलिसांना ठाकरे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर त्याचे नाव समोर आले पोलिसांनी याप्रकरणी दीपक बडगुजर हा मास्टर माईंड असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दीपक बडगुजर याचा शोध सुरू केला असून तो सापडलेला नाही लवकरच त्याची चौकशी करून त्यांच्या विरोधात देखील कारवाई केली जाणार आहे असे पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले. दीपक बडगुजर यांच्या विरोधात प्रथमदर्शनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान यापूर्वी देखील सुधाकर बडगुजर चे माफिया सलीम कुर्ता तिच्याबरोबर संबंध असल्याचे समोर आले होते त्या प्रकरणात देखील स्वतः जिल्हाप्रमुख असलेले बडगुजर यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्या प्रकरणाचा तपास सुरूच आहे आता त्यांच्या मुलाचे नाव समोर आल्यामुळे राजकारणामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. कारवाई चुकीची या सर्व प्रकरणाबाबत बडगुजर यांच्याशी संपर्क होऊ शकला नसला तरी त्यांचे वडील व शिवसेना ठाकरे गटाची जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले की, त्यांनी पक्ष म्हणताना सांगितले आहे की झालेली कारवाई चुकीची आहे विनाकारण कोणताही गुन्हेगार कोणाचेही नाव घेईल आणि त्यातून पोलीस कोणालाही आरोपी बनवतील हे प्रकार चुकीचे आहेत विनाकारण आमचे परिवाराला त्रास देण्यासाठी हे कटकारस्थान होत असल्याचा आरोप केला आहे