नवी दिल्ली – आम आदमी पार्टीचे नेते राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा यांना डोळ्याचा गंभीर विकार जडला असून ते मागील दोन महिन्यांपासून ब्रिटनमध्ये उपचार घेत आहे. त्यांची दृष्टी जाण्याचा धोका होता,अशी माहिती आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी दिली.
सध्या सुरू असलेली लोकसभेची निवडणूक आम आदमी पार्टीसाठी (आप) खुपच खास ठरली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल , उप मुख्यमंत्री मनिष सिसोदिया आदी महत्वाचे नेते सध्या तुरुंगात आहेत. अशा परिस्थित राघव चढ्ढा प्रचारात कुठेही दिसत नसल्याने तर्क वितर्क लढविले जात होते.त्याचे निरसन करण्याचा प्रयत्न सौरभ भारद्वाज यांनी केला.
चढ्ढा यांना डोळ्याचा अत्यंत गंभीर विकार जडला आहे. ते सध्य ब्रिटनमध्ये उपचार घेत आहे. वेळीच उपचार घेतले नसते तर त्यांची दृष्टी जाण्याचा धोका होता. ते लवकरच निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होतील,असे भारद्वाज यांनी सांगितले. राघव चढढा हे आपचे एक दिग्गज नेते आहेत. परंतु गेल्या चार पाच महिन्यांपासून आपच्या बाबतीत मोठ्या घडामोडी घडल्या असताना चढ्ढा कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू होती.