भिवंडीतील उमेदवाराच्या गोदामांवर कारवाई ?

0

ठाणे –  भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या भिवंडीतील अनधिकृत गोदामांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पाहाणी केली. प्रशासनाच्या या कारवाईनंतर भिवंडीत विविध चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा अधिकाऱ्यांवर दबाव आहे. त्यांना पराभव दिसत असल्याने ही कारवाई केली जात आहे, असा आरोप सुरेश म्हात्रे यांनी केला आहे.

भिवंडीचे खासदार आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. गुरुवारी शरद पवार गटाने येथून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी मिळताच, अवघ्या काही तासांत त्यांच्या येवई येथील आर. के. लॉजी वर्ल्ड येथील गोदामांची पाहणी करण्यासाठी एमएमआरडीएचे अधिकारी गेले होते. कोणतीही नोटीस बजावली नसताना अचानक पथक आल्याने ही राजकीय आकसापोटी कारवाई झाल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech