मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आषाडी वारीचे महत्व राजकारण्यांना चांगलेच जाणवू लागले आहे, राज्याच्या कानकोपऱ्यातून पायी वारी करत पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या लाखो भाविकांशी या निमित्ताने संपर्क साधता येतो. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी वारीत चालण्याची घोषणा केल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पायी वारीत सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे. अधिवेशन काळात विधानसभेत बोलताना अजित पवारांनी वारीचे महत्त्व आणि सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. आपण वारीत सहभागी होणार असल्याचेही जाहीर केले.